एक्स्प्लोर

Saiyaara ची 200 कोटींची कमाई, Gen Z चा थिएटरमध्ये धुमाकूळ, आता चालू वर्षातील फक्त एक सिनेमा पुढे

Saiyaara box office collection day 9 : 'सैयारा' चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रिलीजच्या नवव्या दिवशी सिनेमाने मोठं यश मिळवलंय.

Saiyaara box office collection day 9 : ‘सैयारा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कब्जा केला आहे. 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दमदार ओपनिंगसह सुरुवात केली. पहिल्याच दिवशीचा कमाईचा आकडा आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहता हे स्पष्ट झाले की हा चित्रपट कमाल करणार आहे आणि तसंच घडतंय. दररोज नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या चित्रपटाने आज शनिवारी म्हणजे नवव्या दिवशी आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे.  ‘सैयारा’ आता 200 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. (Saiyaara box office collection day 9)

नवव्या दिवशी 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश

मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाने ओपनिंग दिवशी 21.5 कोटी रुपयांची कमाई केली. अवघ्या चार दिवसांत हा चित्रपट 100 कोटींचा झाला होता. पहिल्या आठवड्यातच ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर 172.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. काल शुक्रवारी म्हणजे आठव्या दिवशी या चित्रपटाने 18 कोटी रुपये कमावले. तर आज शनिवारी (ही बातमी लिहीपर्यंत) 11.21 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. (Saiyaara box office collection day 9)

वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

चालू आठवड्याच्या अखेरीस  पुन्हा एकदा प्रेक्षकांचा   ‘सैयारा’‘सैयारा’साठी थिएटरकडे वळला आहे. भारतात या चित्रपटाची एकूण  कमाई 201.96 कोटी रुपये झाली आहे. देशाबरोबरच परदेशातही या चित्रपटाने आपली छाप पाडली आहे. वर्ल्डवाइड कमाईच्या बाबतीत हा चित्रपट यावर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. (Saiyaara box office collection day 9)

आमिर, अक्षय आणि अजय यांच्या चित्रपटांना टाकलं मागे

वर्ल्डवाइड कलेक्शनच्या शर्यतीत फक्त विक्की कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट ‘सैयारा’च्या पुढे आहे. ‘सैयारा’ने जागतिक स्तरावर 278.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर ‘छावा’चे वर्ल्डवाइड कलेक्शन 797.34 कोटी रुपये आहे. ‘सितारे जमीन पर’, ‘हाउसफुल 5’, ‘रेड 2’ यांसारख्या या वर्षीच्या इतर सर्व चित्रपटांना ‘सैयारा’ने मागे टाकले आहे. (Saiyaara box office collection day 9)

अहान आणि अनीतचा हा डेब्यू चित्रपट

‘सैयारा’ हा एक रोमँटिक म्युझिकल लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा अभिनय क्षेत्रातील पहिलाच सिनेमा आहे. पहिल्याच चित्रपटातून या दोघांनी प्रेक्षकांवर जादू केली आहे. ‘सैयारा’चा अंदाजे बजेट 50 ते 60 कोटी रुपये इतका आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kuch Kuch Hota Hai Anjali Is Now 36 Years: 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली झालीय 36 वर्षांची; यंग ब्युटीफुल लेडीचे फोटो पाहिलेत का?

 

 

महत्त्वाच्या बातम्या

कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा पर्याय होऊच शकत नाही, प्रवीण तरडेंचं परखड मत
कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा पर्याय होऊच शकत नाही, प्रवीण तरडेंचं परखड मत
Pranit More : प्रणित मोरेच्या शोमधील वादग्रस्त कंटेंटवर मोठी कारवाई! डॉ. सेजल पवारसह तिघांवर गुन्हा दाखल, समन्सही बजावलं
प्रणित मोरेच्या शोमधील वादग्रस्त कंटेंटवर मोठी कारवाई! डॉ. सेजल पवारसह तिघांवर गुन्हा दाखल, समन्सही बजावलं
Mumbai Police On Pranit More Controversy: प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
Sun Marathi Serial:'सन मराठी'वर येतेय रहस्यांनी भरलेली नवी मालिका; ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत; प्रोमोची एकच चर्चा
'सन मराठी'वर येतेय रहस्यांनी भरलेली नवी मालिका; ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत; प्रोमोची एकच चर्चा

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget