Saiyaara Box Office Collection Day 4: 'सैयारा' चित्रपटानं (Saiyaara Movie) भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office) अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केलीय आणि नवनवे विक्रम रचत सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत. पहिल्या आठवड्यातच त्यानं प्रचंड कमाई केली आणि 'रेड 2' (Raid 2) आणि 'केसरी चॅप्टर 2' (Kesari Chapter 2) सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं. इतकंच नाही तर अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) अभिनीत या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 2025 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 बॉलीवूड चित्रपटांमध्येही (Top 10 Highest Grossing Bollywood Films) चांगली एन्ट्री घेतली आहे. 'सैयारा' चित्रपटानं चौथ्या दिवशी म्हणजेच, पहिल्या सोमवारच्या परीक्षेत कसा निकाल दिला? ते सविस्तर जाणून घेऊयात...
'सैयारा'नं चौथ्या दिवशी किती कमाई केली?
अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या 'सैयारा' चित्रपटाचा उत्साह प्रेक्षकांमध्ये जोरात सुरू आहे. या नव्या स्टारकास्टचा दमदार अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. नवोदित स्टार्सचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतायत. कित्येक दिवसांनी एखाद्या बॉलिवूड सिनेमाचे शो हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' बद्दल अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहेत. 'सैयारा'नं कोणत्याही प्रमोशनशिवाय बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवून दिलाय. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'सैयारा' कित्येक वर्ष इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार्सच्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. विकेंडला मोठा गल्ला जमवल्यानंतर 'सैयारा' आता मंडे टेस्टमध्येही पास झाला आहे.
- चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 'सैयारा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 21.5 कोटींची कमाई केली.
- दुसऱ्या दिवशी, चित्रपटानं 20.93 टक्के वाढीसह 26 कोटींची कमाई केली.
- तिसऱ्या दिवशी, चित्रपटानं 37.50 टक्के वाढीसह 35.75 कोटींची कमाई केली.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सैयारा'नं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच, सोमवारी 18.57 कोटींचा व्यवसाय केला.
- यासह, 'सैयारा'ची चार दिवसांत एकूण कमाई आता 101.82 कोटी रुपये झाली आहे.
'सैयारा'नं चौथ्याच दिवशी रचला इतिहास
'सैयारा'नं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच, मंडेलाही कमाल केली. या फिल्मं ना केवळ चार दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर यावर्षी सुपरस्टार अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर 2 च्या 94.48 कोटींच्या नेट कलेक्शनलाही मात दिली आहे. यासह, हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट बनला आहे. आता 'सैयारा'चं पुढचं टार्गेट 'सिकंदर' आहे. पाचव्या दिवशी, 'सैयारा' 'सिकंदर'ला मागे टाकेल आणि वर्षातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल.
रिलीजच्या चारच दिवसांत सुपरहिट ठरली 'सैयारा'
'सैयारा'नं बॉक्स ऑफिसवर पुरता धुरळा उडवला आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, 'सैयारा'चं बजेट 45 कोटींचं आहे आणि या सिनेमानं फक्त चारच दिवसांत आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई करुन इतिहास रचला आहे. त्यामुळे रिलीजच्या चौथ्या दिवशीच 'सैयारा'नं हिट फिल्मचा टॅग आपल्या नावे केला आहे. दरम्यान, फक्त चारच दिवसांत 'सैयारा'नं बजेटच्या 126.26 टक्क्यांचा नफा कमावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :