Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'सैराट'मध्ये सल्याची भूमिका अभिनेता अरबाज शेखनं नागराज मंजुळेंसोबतचा एक किस्सा सांगितलाय.

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: मराठी सिनेसृष्टीला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा सिनेमा म्हणजे, 'सैराट' (Sairat Movie). हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) सर्वाधिक गाजलेल्या आणि ऐतिहासिक यश मिळवलेल्या सिनेमांपैकी एक. दिग्दर्शक नागराज मंजुळे (Director Nagraj Manjule) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं. 2016 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला नवी ओळख मिळवून दिली. ग्रामीण पार्श्वभूमी, प्रेमकथा, जातीय वास्तव आणि सामाजिक विषमता यांचं प्रभावी चित्रण या सिनेमातून करण्यात आलेलं. या सिनेमात झळकलेली आर्ची म्हणजे, रिंकु राजगुरू (Rinku Rajguru) आणि परशा म्हणजेच, अक्षय ठोसर (Akkash Thosar) यांची जोडी तुफान गाजली. या सिनेमातल्या प्रत्येक पात्रानं चाहत्यांच्या मनात घर केलेलं. त्यापैकी एक पात्र म्हणजे, परशाचा गॅरेजवाला मित्र सल्या.
'सैराट'मध्ये सल्याची भूमिका अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh). 'सैराट' सिनेमातून नागराज मंजुळेंनी बऱ्याच नवख्या कलाकारांना संधी दिली. त्यातलाच एक अरबाज. एका मुलाखतीत बोलताना अरबाजनं सांगितलं की, त्याला घडवण्यात नागराज मंजुळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजही आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना त्यांना विचारुनच करतो, असं त्यानं सांगितलं.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'सेलिब्रिटी कॉर्नर' शोमध्ये अरबाज शेख आणि त्याची पत्नी सिमरन उपस्थित होते. या मुलाखतीत बोलताना अरबाज शेखनं एक किस्सा सांगितला. नागराज मंजुळे यांच्यामुळेच अरबाज शेख आता अभिनेता असण्यासोबतच एक बिझनेसमन आहे. तसेच, पुढे बोलताना त्यानं सांगितलं की, एकदा बुक केलेली नवीकोरी गाडी त्यांनी नागराज मंजुळेंच्या सांगण्यावरुन कॅन्सल केलेली.
नागराज मंजुळेंबाबत अरबाज शेख काय म्हणाला?
'सैराट' फेम सल्या म्हणजेच, अरबाज शेख बोलताना म्हणाला की, "मी आणि सिमरन गाडी बुक करायला गेलेलो. आम्ही क्रेटा गाडी बुक करत होतो. आम्हाला ती, 15-16 लाखांना मिळत होती. आम्ही ती गाडी बुक केली. मी कोणतंही काम केलं की, नागराज मंजुळे सरांना सांगतो... मी सरांना सांगितलं की, मी अशी अशी एक गाडी बुक केली आहे. ती घ्यायला जायचं आहे, आधी पहिले पाच मिनिटांत काहीच बोलले नाहीत... मग मला विचारलं की तुला गाडी का पाहिजे? काय गरज आहे तुला गाडीची?"
"तुला गाडी घ्यायचीच असेल तर सेकंड हॅन्ड गाडी घे... तुला आता गाडीची काही गरज नाही आणि एवढे पैसे त्या गाडीमध्ये जर अडकवले तर त्या मोबदल्यात तुला रिटर्नमध्ये काहीही मिळणार नाही... त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की, हे जे पैसे तू गाडीमध्ये टाकणार आहेस, तेच तू एखाद्या दुकानामध्ये इन्वेस्ट कर... तिथून तुला एक इन्कम सुरू होईल, असा एखादा बिजनेस बघ... म्हणजे उद्या जर तुला काम नाही मिळालं, तर तिथून तुला पैसे मिळतील असं काहीतरी बघ... आम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार केला. गाडी कॅन्सल केली आणि केक शॉप ओपन केलं... नागराज सरांनी सांगितलं म्हणून आम्हाला तो एक मार्ग सापडला...", असं अरबाज शेख यानं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















