Saif Ali Khan: जानेवारी 2025 मध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांच्या घरात एका व्यक्तीने हल्ला केला होता. चाकू घेऊन हा व्यक्ती त्यांच्या घरात शिरला होता. या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता.या घटनेला आता जवळपास एक वर्ष झालं आहे. मात्र, एका मुलाखतीत सैफने सांगितलं की, तो अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. कुटुंब या घटनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. मात्र, आता चाकू दिसला तरी तो वेगळ्या प्रकारे व्यक्त होत असल्याचं तो म्हणाला.

Continues below advertisement

घटनेच्या आठवणी अजूनही सैफच्या मनात

'बॉम्बे टाइम्स'शी बोलताना सैफ अली खान म्हणाला, "आम्ही ही घटना खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. माझ्या मते, माझ्या पत्नीवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. ती खूप संवेदनशील आहे. आम्ही यातून लवकर सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना खरोखरच खूप भयावह होती."सैफ पुढे म्हणाला की, तो अजूनही या घटनेतून पूर्णपणे बाहेर आलेला नाही. "मी अजूनही पूर्णपणे सावरलेलो नाही. कारण जेव्हा मला चाकू दिसतो, तेव्हा मला थोडी भीती वाटते," असं त्याने सांगितलं.

'चाकू तुटला नसता तर...'

हल्ल्यादरम्यान वापरण्यात आलेल्या चाकूबद्दल बोलताना सैफने आपण किती नशीबवान होतो, याची जाणीव अजूनही असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, त्या चाकूचा एक भाग तुटला, हे मोठं नशीब होतं. असं सैफने सांगितलं. तो म्हणाला, "हा चाकू हल्ल्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होता. त्याच्याकडे रॅम्बोसारखा खरा चाकू असता, तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो. तो कुठेही भोसकला जाऊ शकतो. मला शरीराच्या अनेक ठिकाणी दुखापत झाली, पण त्याने मला गंभीरपणे भेदलं नाही. माझ्या नशिबावर माझाच विश्वास बसत नाही."

Continues below advertisement

हल्लेखोराला माफ करण्याची सैफची तयारी

या घटनेनंतरही सैफ अली खानने हल्लेखोराला माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच्या मते, अशा घटना अनेकदा आर्थिक विषमता आणि पैशांच्या कमतरतेमुळे घडतात. हल्लेखोराला आपण नेमकं कुठे आलो आहोत किंवा काय करत आहोत, याची कल्पनाही नसावी, असं सैफने म्हटलं.दरम्यान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची 'हैवान' ही फिल्म नुकतीच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाने आतापर्यंत 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.