Saif Ali Khan : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान कायमच चर्चेत असतो. मग ते त्याचे चित्रपट असोत की वैयक्तिक आयुष्य. बॉलीवूडच्या टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश होतो. पण नवाब असला तरी चित्रपटसृष्टीत त्याला अनेक चढउतारांना तोंड द्यावे लागले आहे. एका मुलाखतीत अलीकडेच त्याने केलेला खुलासा ऐकून चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत . आज सैफ अली खान (Saif ALi Khan) स्टारडम अनुभवत असला आणि कोट्यावधी रुपये घेत असला तरी सुरुवातीच्या काळात त्याला आठवड्याला फक्त 1000 रुपये मिळायचे . पण त्यासाठीही एका निर्मात्याने त्याच्याकडे विचित्र मागणी केली होती .एक्सक्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केलाय .

Continues below advertisement

10 हजार रुपयांच्या मानधनावर निर्मात्याची विचित्र अट ..

एका चित्रपटात काम करताना त्याला निर्मात्याने विचित्र अट घातली होती . सैफला सांगण्यात आले होते की त्याला मिळणाऱ्या प्रत्येक फीसाठी महिला निर्मात्याला 10 वेळा किस करावे लागेल . त्यावेळी आठवड्यासाठी त्याला केवळ एक हजार रुपये दिले जात होते .आणि त्यासाठीही निर्मात्याने ही विचित्र मागणी केल्याचं त्याने सांगितलं .

नवाब असूनही संघर्षमय प्रवास

सैफ म्हणाला, 1993 मध्ये पदार्पण केल्यानंतरही त्याच्यासाठी हा मार्ग खूप कठीण होता .लोकांना वाटायचं की चित्रपट कुटुंबातून आल्याने त्याच्यासाठी गोष्टी सोप्या होतील परंतु ते तसे नव्हते . सेफ चा जन्म निश्चितच श्रीमंत कुटुंबात झाला होता .त्याची आई शर्मिला टागोर एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याचे वडील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू . परंतु सैफचा प्रवास सोपा नव्हता . तो म्हणाला, मी दुसरी भूमिका केली .. तिसरी भूमिका केली ..काही चित्रपट चांगले होते ज्यामुळे मी पुढे जात राहिलो .आणि मग एक वेळ आली जेव्हा एका मागून एक सर्व सिनेमे अपयशी ठरू लागले .

Continues below advertisement

सैफने या मुलाखतीत त्याचा लग्नाबद्दल आणि त्यामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दलही सांगितले .21 व्या वर्षी अमृता सिंगशी लग्न करणे आणि 25 व्या वर्षी सारा अली खानचा पिता होणे यामुळे त्याच्यावर जबाबदारीचा भार वाढल्याचा तो म्हणाला .त्याच्यावर त्याच्या सहकलाकारांपेक्षा जास्त आर्थिक जबाबदाऱ्या होत्या .

सैफचा नवा चित्रपट

सैफने 1993 मध्ये परंपरा या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले . त्यानंतर तो अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला .त्याचे काही चित्रपटही झाले . यावर्षी तो 'ज्वेल थीफ ' मध्ये दिसला .यापुढे हैवान आणि जिस्म 3 या दोन चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे . 90 चे दशक त्याच्यासाठी नेट प्रॅक्टिससाठी होते .या काळात त्याने चुका केल्या आणि त्यातून धडाही शिकला .असं सैफनं सांगितलं . आपण किती पुढे आलो आहोत किती प्रगती केली आहे हे जाणून घेण्यासाठी अलीकडेच त्याने त्याच्या सुरुवातीच्या काळातले म्हणजे पहिल्या दोन दशकांमध्ये सगळे चित्रपट दररोज रात्री एकेक करून youtube वर पहिल्याच तो म्हणाला .