Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये झालेल्या चाकू हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजादचा मालक अमित पांडे याने अंधेरी पश्चिमेतील झेरॉक्स सेंटरमध्ये केलेल्या 6 रुपयांच्या डिजिटल पेमेंटमुळे मुंबई पोलिसांना ठाण्यातील हिरानंदानी येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेण्यास मदत झाली.

आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, सैफ अली खानच्या सदगुरु शरण बिल्डिंगमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये शरीफुल इस्लामचा चेहरा कैद झाला होता आणि अंधेरी रेल्वे स्टेशनवरील फेशियल रेकग्निशन सिस्टम (एफआरएस) शी ते फुटेज जुळवल्यानंतरच पोलिसांना या प्रकरणातील पहिला 'क्ल्यू' मिळाला. त्यानंतर तपासअधिकाऱ्यांनी ते सीसीटिव्ही फुटेज तपासले आणि त्यांना 9 जानेवारी रोजी अंधेरी वेस्टचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीच्या दुचाकीवर शरीफुल मागे बसताना दिसत होता.

पोलिसांनी मोटारसायकलस्वाराची माहिती मिळवली आणि ते धारावी लेनवर पोहोचले आणि दुचाकीस्वाराची ओळख अमित पांडे असे समोर आले.

पांडेने पोलिसांना सांगितले की त्याने शरीफुलला हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी पांडे यांना सीसीटीव्ही फुटेजमधील हल्लेखोराचा फोटो दाखवला, पांडे यांनी त्यांना ओळखले आणि त्यांचे नाव विजय दास असल्याचे सांगितले. हल्लेखोराचा मोबाईल नंबर मिळवल्यानंतर, पोलिसांनी दासला ठाण्यातील हिरानंदानी भागात शोधले, जिथे तो एका कामगार वस्तीच्या मागील झुडपात लपला होता.

पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपी शरीफुलने सैफच्या घरात प्रवेश केल्यानंतर १ कोटी रुपयांची मागणी केली होती, परंतु १६ जानेवारी रोजी तो अभिनेत्याच्या सदगुरु शरण अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये कसा प्रवेश केला याचा उल्लेख आरोपपत्रात केलेला नाही.

आरोपी १६ जानेवारी रोजी पहाटे १.३७ वाजता वर चढताना आणि नंतर ०२.३७ वाजता खाली उतरताना दिसत आहे, असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हल्ल्यानंतर, अभिनेत्याचे कुटुंब आणि घरातील नोकर घाबरले असताना, आरोपी पुढील एक तास त्याच परिसरात कुठेतरी लपून राहिला.

आरोपपत्रानुसार, १६ जानेवारी रोजी पहाटे ३:३७ वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी भारती व्हिला इमारतीच्या परिसरातून बाहेर पडताना दिसला. परंतु कोणालाही त्याची माहिती मिळाली नाही.

वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जमिनीवर विखुरलेले महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी सदगुरु शरण अपार्टमेंटमध्ये शोधाशोध सुरू केली

आरोपपत्रानुसार, घटनेनंतर, फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन, फिंगरप्रिंट तज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने गुन्ह्याच्या ठिकाणाची तपासणी केली. पुराव्याच्या बाबतीत, घटनास्थळावरून २९ नमुने जप्त करण्यात आले आहेत, जसे की चाकूचा तुकडा, घटनास्थळी पडलेले रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेले उशाचे कव्हर, रक्ताने माखलेले गादीचे कव्हर, रक्ताने माखलेले लोड कव्हर, रक्ताने माखलेले कापसाचे पॅड, रक्ताने माखलेले टिश्यू पेपर, साधा कापसाच्या कापडाचा नमुना. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

LSG vs GT : शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का, लखनौ सुपर जायंटस विरूद्धच्या मॅचपूर्वी ऑलराऊंडर आयपीएलमधून बाहेर