Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आला आणि अवघी सिनेसृष्टी हादरली.  16 जानेवारी रोजी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आलेल्या एका व्यक्तीनं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केल्याचा आरोप आहे. पण, आता या वादाला नवं वळण लागलं आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून खुलासा


फॉरेन्सिक तज्ज्ञ प्राध्यापक दिनेश राव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, लीलावती रुग्णालयाकडून वांद्रे पोलिसांना सादर केलेल्या वैद्यकीय-कायदेशीर अहवालात ज्या जखमांचा उल्लेख आहे, त्या चाकूमुळे झालेल्या जखमा नव्हत्या. त्यांनी सांगितलं की, डॉ. भार्गवी पाटील यांनी स्वाक्षरी केलेल्या अहवालात नमूद केलेल्या जखमा केवळ बोथट शस्त्रामुळे झालेल्या असू शकतात.


सैफच्या घरातील स्टाफ नर्सनं 


कथित हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या उपस्थितीवर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या सैफ ली खानच्या पेंटहाऊसमधील स्टाफ नर्सनं पोलिसांना सांगितलं होतं की, हल्लेखोर काठीसारखी वस्तू आणि करवतीचा ब्लेड घेऊन घरात घुसला होता.


चाकूचे तीन भाग सापडले 


दरम्यान, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांचा असा दावा आहे की, त्यानं हल्ल्यावेळी वापरण्याच आलेल्या चाकूचा अडीच इंचाचा तुकडा सैफच्या मणक्याच्या हाडापासून काढला. त्यांनी चाकूच्या तुकड्याचे फोटोही दाखवले. पोलिसांनी त्यांच्या वतीनं दावा केला की, त्यांनी अभिनेत्याच्या अपार्टमेंटमधून चाकूचा दुसरा तुकडा आणि शेवटचा तुकडा वांद्रे तलावाजवळून जप्त केला आहे, जिथे शरीफुलनं पळून जाताना तो फेकला होता.


रुग्णालयावरही प्रश्न उपस्थित 


प्राध्यापक राव यांच्या या खळबळजनक दाव्यांवर रुग्णालय अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणातील इतर अनेक पैलूंबद्दल रुग्णालय आधीच मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. पोलिसांना दिलेल्या अहवालात, हल्ला पहाटे 2.30 वाजता झाल्याचं म्हटलं आहे, तर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ पहाटे 4.11 वाजता सांगितली आहे. ज्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, या धोकादायक हल्ल्यानंतर अभिनेता आणि त्याचं कुटुंब सुमारे दोन तास घरात काय करत होतं?


मित्रांना का बोलावलं?


रुग्णालयानं आधी सांगितलं होतं की, सैफला एका पुरूष आणि एका मुलासह ऑटोरिक्षातून रुग्णालयात आणण्यात आलं. त्या माणसांची ओळख अभिनेत्याचा मित्र अफसर झैदी म्हणून झाली. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, करीना घरी असताना अभिनेत्यानं एका मित्राला रुग्णालयात नेण्यासाठी का बोलावलं? 


जखमी सैफसोबत लहानगा तैमूर का गेला? 


याव्यतिरिक्त लहानग्या तैमूरला त्याच्या रक्तबंबाळ झालेल्या वडिलांसोबत रुग्णालयात का पाठवलं? हा निर्णय अगदीच हैराण करणारा आहे. आधी पार्टी करणारी करिना तिच्या पतीसोबत रुग्णालयात जाण्याच्या स्थितीत नव्हती. पोलीस, खान आणि रुग्णालय प्रशासन जाणूनबुजून मौन बाळगत आहेत का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


आशा भोसलेंच्या नातीचं टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरसोबत सूत जुळलं? बर्थ डे पार्टीतल्या 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष