एक्स्प्लोर

Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?

Sai Tamhankar On Motherhood: आपल्या आजवरच्या करिअरमध्ये सईनं अनेक सिनेमे केले. त्यासोबतच अनेक विषयांवर सई आपलं मत अगदी निर्भिडपणे आपलं मत मांडताना दिसलीय. अशातच सई पहिल्यांदाच तिच्या मातृत्त्वावर बोललीय.

Sai Tamhankar On Motherhood: मराठी सिनेसृष्टीच्या (Marathi Film Industry) आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. असं असलं तरीसुद्धा सई ताम्हणकर केवळ मराठीपुरतीच (Marathi Films) मर्यादीत नाही, तर तिनं अनेक बॉलिवूड (Bollywood Movies) सिनेमांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. केवळ भूमिकांसाठीच नाहीतर, सई तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. खरं तर सई ताम्हणकरनं तिच्या करिअरची सुरुवात मालिकांमधून केली. पण, त्यानंतर तिनं थेट सिनेमांमध्ये एन्ट्री घेतली. आजवर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. पण, 2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली. अशातच सध्या ती तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. याचनिमित्तानं सई ताम्हणकर हिनं नुकतीच एक मुलाखत दिलीय. या मुलाखतीत बोलताना तिनं मातृत्त्वावर भाष्य केलं. 

सई ताम्हणकर (Marathi Actress Sai Tamhankar) हिचा 'अडकित्ता' (Adkitta Movie) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 11 सप्टेंबर रोजी येणारा हा सिनेमा एका वेगळ्या विषयावर आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधून तरी आई आणि तिच्या बाळाला सांभाळणारी नॅनी यांच्याभोवती हा सिनेमा फिरताना दिसतोय. याचनिमित्तानं सई ताम्हणकरनं नुकतीच 'कलाकृती' मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सई ताम्हणकरनं आई होण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलंय. 

आपल्या आजवरच्या करिअरमध्ये सईनं अनेक सिनेमे केले. त्यासोबतच अनेक विषयांवर सई आपलं मत अगदी निर्भिडपणे आपलं मत मांडताना दिसलीय. त्याचप्रमाणे तिनं मातृत्त्वाबद्दलचंही तिचं मत अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे मांडलंय. 

आई होण्याबाबत सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? (Sai Tamhankar On Motherhood)

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली की, "किशोरवयीन मुलाची आई थोडी वेगळी असेल, लहान मुलाची आई थोडी वेगळी वागत असेन हे सगळे अनुभव मला माझ्या कामाच्या निमित्ताने घेता येतात. गंमत म्हणजे हे सगळं करुन जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर वेगळाच प्रयोग होईल. त्यामुळे मला असं वाटतं की हेच आमच्या क्षेत्राचं वेगळेपण आहे..."

दरम्यान, सई ताम्हणकरनं आजवर अनेक भूमिका साकारल्यात. त्यात ती काही सिनेमांमध्ये आई म्हणूनसुद्धा दिसलीय. 'गुलाबजाम' सिनेमात तर तिनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंच्या पत्नीची भूमिका साकारलेली. त्यामध्ये तिला दोन मुलं असल्याचं दाखवण्यात आलेलं. सईनं ती भूमिकाही अत्यंत दमदार पद्धतीनं साकारली आहे. आगामी सिनेमा 'अडकित्ता' 11 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात सई ताम्हणकरसोबत सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले झळकणार आहे. तर, या सिनेमात सई एका नॅनीची भूमिका साकारणार आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर कोणत्या धर्माला मानत होते? ऐकाल तर तुम्हीही सॅल्यूट कराल
नाना पाटेकर कोणत्या धर्माला मानत होते? ऐकाल तर तुम्हीही सॅल्यूट कराल
Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget