Sai Tamhankar : गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलंय. म्हणजे यापूर्वी महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी होतं, असंही नाही. मात्र, सोशल मीडियाच्या आणि डिजीटल युगात याबाबतची माहिती लोकांपर्यंत वेगाने पोहोचते. ग्रामीण भागातील महिला असोत, शहरी भागातील असोत किंवा मग सिनेसृष्टीतील अभिनेत्री असोत. महिलांना अनेकदा वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला (Sai Tamhankar) सांगली ते मुंबई प्रवास करत असताना असाच वाईट अनुभव आला होता. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement


अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सांगितला बसमध्ये आलेला वाईट अनुभव


सई ताम्हणकर म्हणाली, "मी कामाची सुरुवात केली तेव्हा सांगलीहून मुंबईपर्यंतचा प्रवास मी बसने करायचे. रात्रीची बस पकडायची, जी मला सकाळी मुंबईला पोहोचवायची. एकदा अशाच एका प्रवासात, मी बसमध्ये बसले होते. माझ्या मागच्या सीटवर एक मुलगा बसलेला होता. अचानक त्याचा हात मागून माझ्या कमरेजवळ आला. त्याने माझ्या कमरेला हात लावला. मी गोंधळले, क्षणभर समजलं नाही काय झालं. पण लगेच मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि त्याला मुरगळून टाकला. तो मुलगा जोरात किंचाळला, कारण मी खूप जोरात मुरगळला होतं. मला अशा गोष्टींची भीती वाटत नाही. मी त्याला ठामपणे सांगितलं, ‘पुन्हा असा हात आला, तर तुला वेगळा झालेला हात मिळेल.’"


सई ताम्हणकरने 2008 साली आपल्या सिनेक्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘दुन्नियादारी’, ‘पिंजरा’, ‘क्लासमेट्स’, ‘टाइम प्लीज’, ‘हंटर’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने दमदार भूमिका साकारल्या. सईच्या अभिनयात एक वेगळीच ताकद आहे – ती केवळ सुंदर अभिनेत्री नाही, तर तिच्यात प्रत्येक व्यक्तिरेखेला सहजतेने आणि वेगळेपणाने सादर करण्याचं कौशल्य आहे.


सईचा एक मोठा गुण म्हणजे ती केवळ नायिकेच्या पारंपरिक चौकटीत अडकलेली नाही. तिने प्रत्येक भूमिकेला वेगळेपण दिलं आहे – मग ती मॉडर्न मुलगी असो, भावनिक बहीण असो. तिच्या ‘समांतर’ या वेब सीरिजमधील भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष भावली. बॉलिवूडमधील मीमी या सिनेमात देखील तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 


 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Abhijeet Khandakekar Replace Nilesh Sabale In Chala HawaYeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिजीत खांडकेकरकडे; निलेश साबळे म्हणाला...


Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: राज ठाकरे म्हणाले होते, कोण नाही येत बघतोच; विजयी मेळाव्यात कलाकारांची गर्दी, पाहा यादी!