Sagarika-Zaheer Welcome Baby Boy : बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. झहीरची पत्नी सागरिका हिने लग्नाच्या 8 वर्षानंतर मुलाला जन्म दिलाय. दोघांनी बुधवारी (दि.16) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन छोट्या बाळासमवेत काही खास फोटो शेअर केले आहेत. दरम्यान झहीर आणि सागरिकाने त्यांच्या बाळाचं नाव देखील ठेवलं आहे.
सागरीका आणि झहीर खान झाले पालक
'चक दे इंडिया' मधील अभिनेत्री सागरिका आणि तिचा पती झहीर खान यांनी संयुक्त पोस्टमध्ये मुलाला जन्म दिल्याची घोषणा केली आहे. या जोडप्याने त्यांच्या लाडक्या मुलासोबतचे दोन ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये झहीर त्याच्या छोट्या राजकुमाराला मांडीवर घेऊन बसला आहे आणि सागरिका त्याच्या शेजारी स्माईल देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, जोडप्याच्या लाडक्या मुलाचा चेहरा देखील दिसत आहे आणि तो झहीरचे बोट धरून झोपलेला पाहायला मिळतोय.
झहीर आणि सागरिकाने त्यांच्या बाळाचं नावही ठेवलं
या फोटोंमध्ये सागरिका आणि झहीर यांनी कॅप्शनमध्ये त्यांच्या मुलाचे नावही सांगितले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह आम्ही आमच्या लाडक्या लहान बाळ फतेह सिंग खानचे स्वागत करतो."
चाहत्यांकडून झहीर आणि सागरिकावर शुभेच्छांचा वर्षाव
सागरिका आणि झहीरने मुल झाल्याची गोड बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यानंतर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. शार्क टँक इंडियाचे अनुपम मित्तल यांनी लिहिले, "अभिनंदन माय फ्रेंड्स, देव आशीर्वाद देवो." डायना पेंटी, अंगद बेदी, नंदिश सिंग संधू, हुमा कुरेशी आणि अथिया शेट्टी यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग हंगामादरम्यान म्हणजेच 2017 मध्ये सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईत या जोडप्याने साधेपणाने नोंदणीकृत लग्न केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
