Sagar Karande flirting video with Rakhi Sawant: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये स्पर्धकांमुळे रंगत वाढलीये. राखी सावंतची एन्ट्री होताच या शोमध्ये वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राखीनं बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेताच काही स्पर्धकांना त्यांच्या खेळावरुन झापलं. या राखीसोबत अनेकांनी पंगे घेण्याचा प्रयत्न केला. राखीनं प्रत्येक स्पर्धकामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला. राखी आणि रुचिताचं जोरदार भांडण झालं. राखीनं या घरात भडकावण्याचीही कामे केली. राखीनं तन्वीला प्राजक्ताविरोधात भडकवलं होतं. राखीचं सागर कारंडेसोबतही वाजलं होतं, पण नंतर दोघांमधील मतभेद दूर झाले. बिग बॉसच्या घरात सागर कारंडे राखी सावंसोबत फ्लर्ट करताना दिसतो. अशातच एक व्हिडिओ समोर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये सागर कारंडे राखी सावंतसोबत फ्लर्ट करताना दिसतो आहे.
बिग बॉसच्या घरात सागर कारंडे आणि राखी सावंतमध्ये एक वेगळीच बॉन्डिंग पाहायला मिळतेय. सागर कॅप्टन असताना, त्यानं राखीला कॅप्टन रुमचं बाथरुम वापरण्यास परवानगी दिली होती. यानंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर त्याला टोमणाही मारला होता. राखीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच सर्वात जास्त आनंद सागरला झाला असल्याचं बोललं जात आहे. तो बऱ्याचदा राखीसोबत मजाक मस्तीत फ्लर्ट करताना दिसतो. बिग बॉसच्या घरात सागर पुन्हा एकदा राखीसोबत फ्लर्ट करताना दिसला. त्याचा हटके अंदाज पाहून बिग बॉसच्या घरात चांगलाच हशा पिकला.
सागर स्वत:च्या छातीवर हात मारत राखीला म्हणतो, 'हे सगळं मी तु्झ्यासाठी केलं आहे... राखी..' त्यावर राखीला विशाल म्हणतो, '37 दिवस झाले आहेत राखी, पण त्याला मी असं कधी पाहिलं नाही' , विशालच्या म्हणण्यावर सागर म्हणतो, 'स्पेशल लोकांसाठी मी राखून ठेवलंय, ते राखीसाठी होतं. पर्सनॅलिटी कुछ मायने नहीं रखता, सिर्फ और सिर्फ डिंपल मायना रखता है...' सागरचा हा डायलॉग ऐकून राखी मान डोलावते आणि हसते. नंतर सागर कारंडे अभिनेता राजेश खन्नाच्या अंदाजात.., ए पुष्पा आय लव्ह यु रे..'असं म्हणतो. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
कलर्स मराठीने अलिकडेच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा प्रोमो सोशल मीडियात शेअर केला. या व्हिडिओमध्ये राखीला बिग बॉस कन्फेशन रुममध्ये बोलावतात. तसेच बिग बॉस राखीला तिच्या वागणुकीवर घर सोडायला सांगतात. राखी बिग बॉसचं घर सोडायला नकार देते. नंतर काही माणसे कन्फेशन रुममध्ये एन्ट्री घेतात. तसेच राखीला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, राखीला बिग बॉसच्या घरातून बाहेर हाकलले जाणार का? हे लवकरच कळेल.
