एक्स्प्लोर

संजय दत्तच्या सडक सिनेमातील अभिनेत्री आता कशी दिसते? ओळखणंही झालंय कठिण!

Sadak movie Fame Pooja Bhatt : संजय दत्तच्या सडक सिनेमातील अभिनेत्री आता कशी दिसते? ओळखणंही झालंय कठिण! पाहा इन्स्टाग्रामवरील खास फोटो आणि व्हिडीओ..

Sadak movie Fame Pooja Bhatt : दिग्दर्शित महेश भट्ट यांचा 'सडक' हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पूजा भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.  ही एक प्रेमकथा असली, तरी यात सामाजिक वास्तवाचं, लैंगिक शोषणाचं, मानसिक संघर्षाचं आणि मानवी भावनांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं होतं. ‘सडक’ हा सिनेमा केवळ एका प्रेमकथेपुरता मर्यादित न राहता, त्याने अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं आहे.

या सिनेमाची कथा रवी (संजय दत्त) या टॅक्सी ड्रायव्हरभोवती फिरते, जो मानसिकदृष्ट्या खचलेला असतो, कारण त्याच्या लहान भावाने आत्महत्या केलेली असते. रवीने आयुष्यात जे दुःख अनुभवले आहे, त्याचे सावट त्याच्या वागणुकीत दिसते. तो एका वेश्येवर, पूजा (पूजा भट्ट) वर प्रेम करतो आणि तिची मुक्तता करण्याचा निर्णय घेतो. पण पूजा एका क्रूर आणि बलाढ्य किन्नर माफिया – महारानी (सदाशिव अमरापूरकर) यांच्या जाळ्यात अडकलेली असते. रवी आणि पूजाचा संघर्ष फक्त समाजाच्या विरोधात नाही, तर त्यांच्या स्वतःच्या दुःखाशीही आहे.

महेश भट्ट यांचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अभिनेत्री पूजा भट्टला या सिनेमातून वेगळी ओळख मिळाली होती. मात्र, पूजा भट्ट सध्या काय करते? कशी दिसते? याबाबत जाणून घेऊयात... 

पूजा भट्ट अलीकडेच  बिग बॉस ओटीटी 2 मध्ये झळकली होती, ती तिच्या धाडसी आणि पारंपरिक चौकटीबाहेरील स्टोरीसाठी ओळखली जाते. तिने केवळ वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजे 1989 मध्ये डॅडी या चित्रपटातून महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळात, अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून तिने आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. तिच्या कारकिर्दीत दिल है कि मानता नहीं (1991), जुनून (1992), नाराज़ (1994), आणि चाहत (1996) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. काही काळ अभिनयापासून दूर राहिल्यानंतर, तिने सडक २ (2020) आणि बॉम्बे बेगम्स (2021) या नेटफ्लिक्स मालिकेतून पुनरागमन केले.पूजा भट्ट एका नव्या साप्ताहिक पॉडकास्टमध्ये बोलताना दिसली होती. तिने पूजा भट्ट शो नावाच्या नवा टॉक शो देखील सुरु केला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by OfficialPETAIndia (@petaindia)

‘सडक’ची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सदाशिव अमरापूरकर यांचा महारानी या नकारात्मक भूमिकेतील अभिनय. त्यांचा चेहरा, आवाज, देहबोली आणि क्रूरता – सगळं काही प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्यासाठी त्यांना 'फिल्मफेअर'चा सर्वोत्तम खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. त्यांची ही भूमिका एकेकाळी समाजात चालत असलेल्या ट्रॅफिकिंग आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर समस्यांना प्रामाणिकपणे समोर आणते.

संजय दत्तने रवीची भूमिका अतिशय जिवंत केली आहे. त्याचे डोळे, चेहरा, आणि अभिनय – सगळं एका त्रस्त पण लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब होतं. पूजा भट्टचं सौंदर्य, भावनिकता आणि ठाम भूमिका देखील प्रेक्षकांना भावली. या सिनेमाची गाणीही आजतागायत लोकप्रिय आहेत – "तुम्हे अपना बनाने की कसम खाई है", "हम तेरे बिन अब रह नहीं सकते" यांसारखी गाणी आजही प्रेमी युगलांच्या मनात स्थान ठेवतात.

सडक हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो एका काळाच्या सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारा आरसा होता. तो प्रेम, संघर्ष, अन्यायाविरुद्ध बंड आणि मानसिक आरोग्य यांचा संगम होता. म्हणूनच आजही ‘सडक’ हा सिनेमा लोकांच्या आठवणीत आहे.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : कार हवेत उडणारा दाक्षिणात्य सिनेमातील सीन, शूटिंगवेळी स्टंटमॅनचा जागेवर जीव गेला, व्हिडीओ पाहून अंगावर काटा

वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या 'मिस पुद्दुचेरी'ने जीवन संपवलं, झोपेच्या गोळ्या खाऊन टोकाचा निर्णय, धक्कादायक कारण समोर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 Box Office Collection Day 35: 'धुरंधर 2'च्या केसालाही धक्का लावू शकला नाही अक्षय कुमारचा 'भूत बंगला'; 35 व्या दिवशीही बॉक्स ऑफिस हादरवलं, दिग्गजांना लोळवलं
'धुरंधर 2'च्या केसालाही धक्का लावू शकला नाही अक्षय कुमारचा 'भूत बंगला'; 35 व्या दिवशीही बॉक्स ऑफिस हादरवलं, दिग्गजांना लोळवलं
Director David Dhawan On Retirement: 'मला आता आणखी काम नाही करायचं...', गोविंदाला सुपरस्टार बनवणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाची बॉलिवूडमधून निवृत्ती? स्वतःच केला खळबळजनक खुलासा...
'मला आता आणखी काम नाही करायचं...', गोविंदाला सुपरस्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाची बॉलिवूडमधून निवृती?
Haryanvi Actress Divyanka Sirohi Dies Heart Attack: वयाच्या 30 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास; हृदयविकाराचा झटका ठरलं मृत्यूचं कारण
वयाच्या 30 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास; हृदयविकाराचा झटका ठरलं मृत्यूचं कारण
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
Embed widget