Sacred Games Cuckoo Kubbra Sait News: सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सिरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाली.  अजूनही ही वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. या सिरीजमधील प्रत्येक पात्राला लोकप्रियता मिळाली. सिरीजमधील कुकू ही व्यक्तीरेखा सगळ्यांनाच ठाऊक असेल.  कुब्रा सैत (Kubbra Sait) हिनं ही व्यक्तीरेखा उत्तमरित्या साकारली.   आता अभिनेत्री तिची आगामी सिरीज संकल्पमुळे चर्चेत आहे.  या सिरीजमध्ये तिनं खास डीएसपी  परवीन शेखची भूमिका साकारलीये. परवीन शेख हे एक धाडसी कॅरेक्टर आहे. अशी माहिती अभिनेत्रीने मुलाखतीत दिली.  

Continues below advertisement

अभिनेत्री कुब्रा सैत सध्या प्रोफेशनलसह पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. तिनं आतापर्यंत आपल्या आयुष्यात बरेच बेधडक निर्णय घेतले आहेत.  कुब्राचा जन्म पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणाऱ्या घरात झाला. घरातील  राजकीय क्षेत्रात सक्रीय असूनही तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा निर्णय घेतला.  अभिनेत्रीने अॅक्ट्रेस होण्यासाठी मायक्रोसॉफ्टची नौकरी सोडली.  परंतु, तिनं आपली जिद्द सोडली नाही. अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तसेच नाव कमावले. 

 

Continues below advertisement

तुम्हाला ठाऊक आहे का? अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात सलमान खानच्या चित्रपटातून केली होती.  तिनं मुलाखतीत सलमान खानसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? याची माहिती दिली.  सलमान खानसोबत काम करताना भीती वाटली नाही का? असा तिला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्री म्हणाली, 'नाही यार. मी खूप कॉन्फिडेंट होते.  सगळ्यांसोबत बसून मी गप्पा मारत होते. मला  प्रत्येकाबद्दल जाणून घ्यायचे होते.  मी सलमान सरांसोबतही गप्पा मारत होते. मी त्यांना चित्रपटाच्या निगडीत बरेच प्रश्न विचारत होते'.

'सलमान खान चांगले आहेत. ते माझ्यासोबत चर्चा करायचे. मला असं कधी वाटलं नाही की, मी नवीन आहे तर मी कोपऱ्यात बसू. कदाचित मी कोपऱ्यात बसण्यासाठी बनलेली नाही. मी सेंटर रुमसाठी बनली आहे.   मला असं वाटतं की, इंडस्ट्रीत काम करत असताना स्वत:वर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.  जर तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवू शकत नाही तर, तुमच्यावर कुणी विश्वास का ठेवेल?  जर तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवाल तर, तुमचा द  एंड कधीच होणार नाही', असं अभिनेत्री म्हणाली.