Sachin Tendulkar : क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अशी अलौकीक कामगिरी केली की, तो भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देवच ठरला. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नोव्हेंबर 2013 मध्ये आपला 200 वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला. आजही देशभरात प्रत्येक घराघरात त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. अलीकडेच सचिनने (Sachin Tendulkar) ‘आस्क मी एनिथिंग’ या सत्रात भाग घेतला. यामध्ये त्याने चाहत्यांकडून आलेल्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.
सचिन तेंडुलकरला आवडतो 3BHK हा सिनेमा
एका चाहत्याने सचिनला (Sachin Tendulkar) विचारलं, "तुम्ही किती वेळा चित्रपट पाहता आणि त्यापैकी आवडते चित्रपट कोणते आहेत?" यावर त्याने दोन चित्रपटांची नावं घेतली. त्यापैकी एक तामिळ चित्रपट असून दुसरा मराठी आहे. सचिनला आवडलेला पहिला चित्रपट म्हणजे 3BHK. जुलै महिन्यात प्रदर्शित झालेला हा तामिळ सिनेमा अरविंद सच्चिदानंदम यांच्या 3BHK Veedu या कथानकावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थने प्रमुख भूमिका केली आहे.
याशिवाय सचिनला आवडलेला दुसरा चित्रपट आहे "आता थांबायचं नाय". शिवराज वायचळ दिग्दर्शित या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, पर्णा पेठे, आशुतोष गोवारीकर असे नामवंत कलाकार झळकले. सचिनकडून स्वतःच्या चित्रपटाचं कौतुक झाल्यावर दिग्दर्शक शिवराज आनंद गगनात न मावण्यासारखा आनंदी झाला. त्याने खास पोस्ट शेअर करत सचिनचे आभार मानले – “सचिन सर खूप आभार... जबरदस्त वाटतंय... आता थांबायचं नाय”.
नेटकऱ्यांकडून शिवराज वायचळचं तोंडभरुन कौतुक
शिवराजच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. “जीवन सफल झालं...”, “जिंकलास पोरा”, “क्रिकेटचा देव तुमचं कौतुक करतोय, यापेक्षा मोठं काय असू शकतं”, “वाह शिवराज, देवाचा आशीर्वाद मिळाला” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या