Sachin Deshpande Replace From Serial: मनोरंजन विश्वातलं (Entertainment World) ग्लॅमर जेवढं झगमगतं दिसतं, तेवढाच पडद्यामागे अंधार आहे, याचा प्रत्यय आजवर अनेक सेलिब्रिटींच्या (Marathi Celebrity) वक्तव्यावरुन समोर आलाय. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्यानंही (Marathi Actor) यावर भाष्य केलंय. इन्स्टाग्राम फॉलोअर्समुळे (Instagram Followers) त्याला न सांगताच एका बड्या चॅनलनं मालिकेतून (Marathi Serial) रिप्लेस केल्याची धक्कादायक गोष्ट त्यानं सांगितली. ज्याचे इन्स्टा फॉलोवर्स जास्त होते. आजकाल इंडस्ट्रीमध्ये हाच फॉर्म्युला झालाय, असंही अभिनेता म्हणाला आहे. 'होणार सून मी या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi) फेम मराठी अभिनेता सचिन देशपांडे (Marathi Actor Sachin Deshpande) यानं मराठी इंडस्ट्रीचं हे भीषण वास्तव मांडलं आहे. 

Continues below advertisement

यापूर्वीही अनेक मराठी सेलिब्रिटींनी इन्स्टाग्राम फॉलोअर्स पाहूनच हल्ली इंडस्ट्रीत काम मिळत असल्याचा दावा केलेला. त्याचप्रमाणे, हल्ली अभिनेता, अभिनेत्रींपेक्षाही टेलिव्हिजनवरच्या मालिकांसाठी रिलस्टार्सना पसंती दिली जाते, असंही अनेक कलाकारांनी यापूर्वी सांगत, याबाबत खंत व्यक्त केलेली. अशातच आता सचिन देशपांडे यानं सांगितलेल्या आपबीतीनं पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. सचिन देशपांडे यानं नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. त्यावेळी त्यानं हे धक्कादायक वास्तव सांगितलंय. 

मराठी अभिनेता सचिन देशपांडे नेमकं काय म्हणाला? (Sachin Deshpande On Marathi Industry)

Continues below advertisement

'होणार सून मी या घरची' फेम मराठी अभिनेता सचिन देशपांडे म्हणाला की, "आजकाल ऑडिशन्सची पद्धत फार बदललीय. पूर्वी कलाकारांचं नाव सुचवण्याचं काम दिग्दर्शक करायचा. त्यावेळी दिग्दर्शक हाच 'कॅप्टन ऑफ द शीप' असायचा. सिनेमाला दिग्दर्शकाचं फार महत्त्व असतं, पण त्यावेळी टीव्हीवरसुद्धा दिग्दर्शकाला तितकंच महत्त्व दिलं जायचं. पण आता तसं राहिलेलं नाही... आता कास्टिंग ही पूर्णपणे वाहिनीच्या हातात गेलीय. चॅनलवर बसलेले लोक असतात, ते तुमचं कास्टिंग करतात... पूर्वी आम्ही फोन करून किंवा प्रत्यक्षात दिग्दर्शकापर्यंत पोहोचू शकत होतो. पण आता जे लोक तुम्हाला काम देणारे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही..."

अचानक दोन दिवसांनी मला कळालं, माझ्याजागी त्या मालिकेत दुसऱ्याच अभिनेत्याला रिप्लेस केलंय : सचिन देशपांडे

"मला नंबर वन चॅनेलच्या एका मालिकेत कैमियो रोलसाठी बोलावलेलं. मी त्यांना माझा होकार कळवला, मानधनाबद्दलही बोलणं झालं. माझं ज्या प्रोडक्शनवाल्यांसोबत बोलणं सुरू होतं, त्यांचा मला काही वेळानं मेसेज आला की, दादा तुझा इन्स्टा आयडी पाठवतोस का? मी त्याला यामागचं कारण विचारलं, तर तो म्हणाला की, तुझे फॉलोवर्स बघायचे आहेत. मग मी त्याला माझा इन्स्टा आयडी पाठवला, पण पुढे काहीच रिप्लाय आला नाही... अचानक दोन दिवसांनी मला कळालं की, माझ्याजागी त्या मालिकेत दुसऱ्याच एका अभिनेत्याला रिप्लेस करण्यात आलेलं. ज्याचे इन्स्टा फॉलोवर्स जास्त होते. आजकाल इंडस्ट्रीमध्ये हाच फॉर्म्युला झालाय, ज्यामध्ये तुमचे फॉलोवर्स किती आहेत, यावर तुमचं कास्टिंग ठरतं...", असं म्हणत अभिनेता सचिन देशपांडे यांनं मराठी मनोरंजन विश्वाचं भीषण वास्तव सांगितलंय. 

दरम्यान, सचिन देशपांडे म्हणजे, मराठी मनोरंजनविश्वातील एक प्रसिद्ध नाव. सचिन देशपांडेनं 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'तुझेच गीत मी गात आहे' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. याव्यतिरिक्त सचिन 'फॅमिली कट्टा' आणि 'दुसरी गोष्ट' यांसारख्या सिनेमांमध्येही झळकलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला