Bigg boss marathi 6: बिग बॉसच्या घरातून एक धक्कादायक एलिमिनेशन करण्यात आलं आहे. कलर्स मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमुळे चाहत्यांसह सगळ्यांनाच धक्का बसलाय . बिग बॉसचा गेम हलक्यात घेतल्यामुळे एका स्पर्धकाला एलिमिनेशनचा धक्का बसलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बॉसच्या घरातील टॉप 5 मध्ये जाईल अशी अपेक्षा असणारी रुचिता जामदारला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवल्याचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. आत्ताच्या आत्ता बॅगा उचलून निघून जाण्यासाठी रितेश भाऊंनी तिला सांगितल्याचं दिसतं.या प्रोमोमध्ये घरातून बाहेर काढल्यामुळे रुचिता प्रचंड रडत असल्याचं दिसतं.

Continues below advertisement

या आठवड्यात बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर जाण्यासाठी एकूण 7 सदस्य नॉमिनेट होते. प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, रुचिता जामदार, संस्कृती साळुंके, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांच्यापैकी कोण घराबाहेर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शोमधून एक शॉकिंग अपडेट समोर आली आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.

रुचिता जामदार जाणार घराबाहेर?

बिग बॉसच्या घरात कधी कोणता ट्विस्ट येईल हे सांगता येत नाही. आठवडाभर झालेला गेम घरात झालेली वादावादी, भांडणं आणि प्रेक्षकांची पसंती या सगळ्याचा झुकता माप कोणाला मिळतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक भाऊचा धक्क्याची वाट पाहत असतात. आज भाऊचा धक्का होणार आहे. आजच्या भागात रितेश भाऊ एका स्पर्धकाची घरातून हकालपट्टी करणार आहेत. ज्या स्पर्धकाने गेम हलक्यात घेतला त्याच्यावर बिग बॉस आणि मी ॲक्शन घेणार असं म्हणत एका स्पर्धकाला आपल्या नावाची पाटी खाली उतरवून घरातून निघून जाण्यास रितेश भाऊ सांगतात. रितेश भाऊंचा आदेशावर रुचिता धायममोकलून रडताना दिसते. सागर, आयुषही रडताना दिसतात. सर्वच स्पर्धकांना मोठा धक्का बसल्याचे दिसतं. पण अद्याप नेमकं कोणत्या स्पर्धकाला घराबाहेर जाण्याचा आदेश दिलाय हे अस्पष्ट आहे. अनेक चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा अंदाज ती स्पर्धक रुचिता जामदार असू शकते असा आहे. सोशल मीडियावर सध्या रुचिता जामदारच एलिमिनेशन झाल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

Continues below advertisement

 

बिग बॉसच्या घरात आल्यापासून रुचिता जामदार तिचे घरातील जवळपास प्रत्येकाशीच वादविवाद झाले आहेत. घरात आल्यापासून प्रत्येक टास्क आणि प्रत्येक ठिकाणी रुचिताचा आवाज वाढलेला दिसला. गेल्या आठ आठवड्यांमध्ये रितेश भाऊंनी अनेकदा रुचिताला आरसा दाखवल्याचे दिसलं . रुचिताच्या भांडणामुळे आणि एकूणच बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक जण तिच्यावर नाखुश होते. घरातील अनेकांनी तिच्या वागणुकीबद्दल नाराजी दर्शवली होती. सोशल मीडियावर अनेक जणू रुचिताला घराबाहेर काढा अशी मागणी करत होते . तर काहीजण रुचिता टॉप 5 मध्ये जाईल अशी आशा लावून बसले होते .दरम्यान, बिग बॉसच्या घरातून रुचिताचे एलिमिनेशन झालं कि आणखी कोणाचं ? हे आजच्या भागात स्पष्ट होईल.