Junior NTR In Oscars : भारतीय चित्रपट इतिहासात अनेक महान अभिनेते झाले आहेत आणि गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी त्यांच्या ऑनस्क्रीन कामगिरीचे कौतुकदेखील केले आहे. ज्युनियर एनटीआर हा या पिढीतील अभिनेत्यांपैकी एक आहे. एसएस राजामौली (S.S.. Rajamouli) दिग्दर्शित आर.आर.आर (RRR) यांच्या चित्रपटातून ज्युनिअर एनटीआरचे देशातच नाही तर जगभरातून कौतुक होत आहे.
ज्युनिएर एनटीएरचा आरआरआर या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. RRR चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता ज्युनिअर एनटीआरला प्रसिद्ध व्हरायटी मॅगझीनने टॉप 10 कलाकारांमध्ये स्थान दिले आहे. खरंतर, ही यादी अजून जाहीर करण्यात आली नाही. मात्र, या मॅगझीनच्या अंदाजानुसार ज्युनिअर एनटीआर टॉप 10 च्या यादीत आपलं स्थान मिळवू शकतो. असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
RRR स्टारने ऑस्करमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'साठी व्हरायटीच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवले आहे. तो ह्यू जॅकमन (द सन) आणि विल स्मिथ (एमॅन्सिपेशन) या सारख्यांमध्ये सामील होतो. ज्युनियर एनटीआरला याची माहिती मिळताच, 'ऑस्करसाठी आरआरआर' ट्विटरवर ट्रेंड करू लागला. ऑस्टिन बटलर एल्विसमधील त्याच्या कामासाठी यावर्षी हा पुरस्कार जिंकेल, असा अंदाजही वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्याने ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अंदाजानुसार, टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या मॅगझीनने आपल्या भविष्यकालीन यादीत एसएस राजामौली यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून समावेश केला आहे. भारतासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. एनटीआर आणि राजामौलीचे चाहतेदेखील या बातमीमुळे फार खुश आहेत. 'RRR'ला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यापूर्वीच अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळालेले असताना, हा चित्रपट नक्कीच ऑस्करसाठी नामांकित होईल अशी जोरदार चर्चा आहे. या वर्षीचे ऑस्कर 12 मार्च 2023 रोजी डॉल्बी थिएटरमधून ABC वर थेट प्रक्षेपित केले जातील. एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर 11 जानेवारी रोजी लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :