Rohan Gujar Ketaki Palav Exit Aamne Samane Natak: मराठी अभिनेता (Marathi Actor) रोहन गुजर (Rohan Gujar) आणि अभिनेत्री केतकी पालव (Actress Ketaki Palav) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच चर्चेत आलाय. दोघांनाही कोणतीही पूर्वसुचना न देता नाटकातून काढून टाकण्यात आलंय. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. रोहन आणि केतकी यांनी संपूर्ण व्हिडीओमध्ये आपली खंत बोलून दाखवली आहे. दोघांच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Continues below advertisement

मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं 'आमने सामने' नाटक चर्चेत आलं आहे.  मराठी अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी व्हिडीओ शेअर करत आपल्याला नाटकातून अचानक काढून टाकल्याचं सांगितलंय. लीना भागवत, मंगेश कदम यांच्यासोबत या नाटकात अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालवदेखील होते. पण, 18 ऑक्टोबरचा प्रयोग झाला आणि एक मिटिंग झाली. त्यानंतर रोहन आणि केतकी यांना थेट, 'हा तुमचा शेवटचा प्रयोग...', असं सांगितलं गेलं. दोघांनी व्हिडीओ शेअर करत याबाबत सर्वकाही सांगितलंय.   

रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलं? (Rohan Gujar Ketaki Palav Post)

Continues below advertisement

मराठी अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये दोघेही काहीसे हिरमुसलेले दिसतायत. त्या व्हिडीओमध्ये केतकीनं म्हटलंय की, "आता भेटूयात आमने-सामने हे वाक्य आम्ही कधीच बोलू शकणार नाही. कारण यापुढे आम्ही दोघंही आमने-सामने या नाटकाचा भाग नसणार आहोत..." पुढे बोलताना रोहन गुजर म्हणाला की, तो गेली 7-8 वर्ष हे नाटक करतोय आणि तब्बल 670 प्रयोग केलेत. तर, केतकीनं 520 प्रयोग केल्याचं सांगितलं. तसेच, दोघांनीही एक छानसं गुडबायही केलेलं नाही, अशी खंत व्यक्त केली. 

18 ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरात एक नाटकाचा प्रयोग झाला. प्रयोग झाल्यानंतर एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांना असं सांगितलं गेलं की, हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे, असंही दोघांनी सांगितलं. 

"25-25 वेळा येऊन लोकांनी हे नाटक पाहिलंय. या नाटकाला शेवटचं गुडबाय नाही म्हणू शकलो आणि शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही...", असंही दोघे म्हणालेत. रोहनच्या बाबांनी 11 वेळा नाटक पाहिलं. जर त्यांना माहीत असतं की, हा आमचा शेवटचा प्रयोग आहे. तर आपलं कुटुंब शेवटचा प्रयोग पाहायला आलं असतं. कुठलीही पूर्वकल्पना न देता नाटकातून काढून टाकल्याचंही रोहन आणि केतकी म्हणालेत. 

पैसे, मानधनच्या कारणास्तव नाटकातून काढून टाकल्याचं त्यांनी सांगितलं. कोविडमध्ये नाटक दोनदा बंद झालं. तेव्हा अर्ध मानधन घेऊन नाटकाचे प्रयोग केल्याचा खुलासाही रोहन गुजरनं केलाय. निर्मात्यांमधील वादामुळेही आमने-सामने नाटक बंद झालं होतं. मात्र तरीदेखील आम्ही या नाटकाचे प्रयोग केले, प्रेक्षकांनी या नाटकासाठी दिलेल्या प्रेमामुळे त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि शेवटी या नाटकात दिसणार नसल्यामुळे प्रेक्षकांची माफीही रोहन आणि केतकी यांनी मागितली आहे.

रोहन, केतकीच्या व्हिडीओ पाहून मराठी सेलिब्रिटींचा संताप, काय म्हणाले?

रोहन गुजर आणि केतकी पालव हिच्या व्हिडीओवर काही मराठी कलाकारांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी अभिनेता आस्ताद काळेनं "खरं कारण माहीत आहे, जे कळल्यानंतर मलाही संताप आला होता. तुमचं काय झालं असेल?", असं म्हटलंय. तर, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं एक अभिनेत्री म्हणून तुमच्या भावना समजू शकते आणि रिप्लेसमेंटचं दु:ख काय असतं, ते जवळून पाहिल्याचं कमेंटमध्ये म्हटलंय. तसेच, मयुरी देशमुख, शशांक केतकर, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, स्पृहा जोशी, ऋचा आपटे, विकास पाटील या कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...