Rj Mahvash, Pyaar Paisa Profit Trailer : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (YuzvendraChahal) याची कथित गर्लफेंड आर जे महावश (Rj Mahvash) गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) डान्सर धनश्री वर्मासोबत (DhanashreeVerma) घटस्फोट झाल्यानंतर आर जे महावश अनेकदा युजवेंद्र चहलसोबत स्पॉट झालीये. दरम्यान, सोशल मीडियावर चर्चेत आली असतानाच आर जे महावशचं नशिब फळफळलं आहे. आर जे महावशला एका वेब सिरीजमध्ये महात्त्वाचा रोल मिळालाय. 'प्यार पैसा प्रॉफिट', असं आर जे महावशच्या पहिल्या वेब सिरीजचं नाव आहे. या सिरीजमधील तिच्या रोलची चर्चा सुरु झाली आहे. या सिरीजमध्ये महावशचे रोमँटिक आणि बोल्ड सीनही पाहायला मिळत आहेत.
'प्यार पैसा और प्रॉफिट' चा पहिला एपिसोड 7 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
'प्यार पैसा और प्रॉफिट' या वेब सिरीजमध्ये आर जे महावश हिच्यासोबत मिहीर आहुजा मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. ही वेब सिरीज 7 मे 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईम यावर पाहायला मिळणार आहे. त्यादिवशी या वेबसिरीजचं स्ट्रिमिंग सुरु होणार आहे. आरजे महावशने या सिरीजचा ट्रेलर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय.
वेबसिरीजबद्दल माहिती देताना आर जे महावश म्हणाली, अभिनेत्री म्हणून माझी ही पहिली वेब सिरीज आहे. हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. तुम्ही भरपूर प्रेम द्या... तुम्ही या वेब सिरीजला प्रेम नाही दिलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही.
हिल्याच वेब सिरीजमध्ये आर जे महावशचे इंटीमेंट सीन
दरम्यान, आर जे महावश तिच्या पहिल्याच वेब सिरीजमध्ये इंटीमेंट सीन देताना पाहायला मिळाली आहे. याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की, चहल भाईंना हे सारं बघवलं जाणार नाही. महावशची ट्रेलरची पोस्ट युजवेंद्र चहलने लाईक केलेली पाहायला मिळाली. यावर एका युजरने म्हटलंय की, चहल भाईने पहिल्यांदाच लाईक करुन ठेवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
