Genelia Deshmukh on Husband Riteish Deshmukh: बॉलिवुडच्या गोड जोडप्यांपैकी रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे एक जोडपं आहे. दोघेही त्यांच्या केमिस्ट्रीसाठी ओळखले जातात.जेनेलिया आणि रितेश या दोघांचाही मजेशीर अंदाज सोशल मीडियावरुन पाहायला मिळतो. बराच काळ डेट केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
पण लग्नाआधी रितेशने जेनेलियासोबत ब्रेकअप केलं होतं. याविषयी जेनेलियाने नुकतच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. श्रेया गोधावतला दिलेल्या मुलाखतीत जेनेलियाने तिच्या आणि रितेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. रितेशने कसं ब्रेकअप केलं होतं आणि त्यानंतर जेनेलियाची काय अवस्था झाली होती याविषयी जेनेलियाने सांगितलं आहे.
रितेशने केलं होतं 'एप्रिल फुल'
जेनेलियाने हा एक प्रँक होता असाही खुलासा केला आहे. यावर तिने म्हटलं की, त्या दिवशी एप्रिल फूल होता.रितेशने मला मेसेज केला की , आता आपण एकत्र राहू शकत नाही आणि त्यानंतर तो झोपायला गेला. रितेश उशिरा झोपायचा म्हणून त्याने हा मेसेज रात्री 1 वाजल्यानंतर पाठवला. हा मेसेज पाठल्यानंतर तो झोपला. हा मेसेज मी रात्री 2 वाजता वाचला आणि मग काळजी वाटू लागली. काय झाले ते मला समजलंच नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत मी वेडी झाले होते. पण तो जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हतं.
मस्करी पडली महागात
जेनेलियाने पुढे म्हटलं की, सकाळी उठल्यावर त्याने मला कॉल केला आणि म्हणाला, हाय कशी आहेस? त्यावर मी त्याला म्हटलं की, आता आपण बोलणं बंद करायला हवं.. त्यावर रितेशने मला काय झालं असं विचारलं...काय चुकीचं झालं आहे का? त्यावर मी म्हटलं की, तू असं म्हणतोयस जसं काही झालंच नाही आहे. त्यावेळी मी त्याने केलेल्या मेसेजची आठवण करुन दिली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि त्याने म्हटलं की, मी एप्रिल फुल केलं होतं. ती फक्त एक मस्करी होती. त्यानंतर मला जास्तच राग आला.