Raja Shivaji Box Office Collection: जिओ स्टुडिओज (Jio Studios) आणि मुंबई फिल्म कंपनी (Mumbai Film Company) प्रस्तुत रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji)  या भव्य ऐतिहासिक सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच विकेंडमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर (Biggest Ppener In Marathi Film Industry) ठरण्याचा मान पटकावला आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई नोंदवली. त्यानंतर शनिवारी मजबूत पकड कायम ठेवत, रविवारी चित्रपटानं आणखी मोठी झेप घेत विकेंडमधील सर्वोच्च कमाई केली. रविवारी सिनेमानं 13.10 कोटी नेट कमाई करत शनिवारीच्या तुलनेत 13.5% वाढ नोंदवली. यासह, तीन दिवसांची एकूण कमाई भव्य 37.00 कोटी नेट झाली आहे. 

चित्रपटाच्या प्रभावी मांडणी, भव्य निर्मितीमूल्ये आणि भावनिक कथनशैलीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. थिएटरमधील अनुभव हा एक सणासारखा वाटत असून, महाराष्ट्रभर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हाऊसफुल्ल शो आणि वाढती प्रेक्षकसंख्या हे या यशाचे प्रमुख निदर्शक ठरत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Continues below advertisement

बॉक्स ऑफिस कलेक्शन (India)

  • पहिला दिवस (शुक्रवार): 12.40 कोटी
  • दुसरा दिवस (शनिवार): 11.50 कोटी
  • तिसरा दिवस (रविवार): 13.10 कोटी
  • एकूण (ओपनिंग वीकेंड): 37.00 कोटी नेट

प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व स्तरांतून मिळणारे कौतुक लक्षात घेता, 'राजा शिवाजी' आगामी दिवसांतही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

3 दिवसांत किती कमावले? (Raja Shivaji Box Day 3)

सॅल्कनिकनं दिलेल्या आकडेवारीनुसार, रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 11.35 कोटींची कमाई केलेली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शनिवारी 10.55 कोटींची कमाई केली. पण, तिसऱ्या दिवशी सिनेमानं जोरदार मुसंडी मारत 12 कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच, एकूण तीन दिवसांत रितेश देशमुख यानं एकूण 33.90 कोटींची कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या एकूण कमाईत सर्वात मोठा वाटा हा मराठी आवृत्तीचा आहे. 'राजा शिवाजी' यावर्षीचा मराठीतील सर्वात कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?