Riteish Deshmukh Loses His Temper In Lock Up 2: एकता कपूरचा (Ekta Kapoor) रिअॅलिटी शो (Reality Show) 'लॉक अप 2' (Lock Upp 2) सध्या भलताच चर्चेत आहे. राम कपूरपासून (Ram Kapoor) ते शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) यांच्यासारखे लोकप्रिय सेलिब्रिटी यात स्पर्धक म्हणून सहभागी झालेत, तर आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) हे या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. रितेश देशमुख म्हणजे, शांत आणि आनंदी स्वभावाचं व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो, पण 'लॉक अप 2'मध्ये त्याचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. त्यामुळे त्याचे चाहतेही धास्तावले आहेत. सध्या सोशल मीडियावर या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये रितेश देशमुख कन्टेस्टंट योगेश रावत याला कठोर शब्दांत फटकारताना दिसतोय. रितेश देशमुखचा हा राग ओढवून घेण्यासारखं योगेश रावत (Yogesh Rawat) यानं नक्की काय केलं? जाणून घेऊयात.
रितेश का चिडला, नेमकं घडलं काय? (Riteish Deshmukh Loses His Temper Video)
नुकत्याच आलेल्या टीझरमध्ये आकांक्षा चमोला आणि पामेला एका सेलमध्ये होते, तर राम कपूर आणि श्रेया कालरा दुसऱ्या सेलमध्ये होते. दोन्ही गटात कंट्रोलर होण्यासाठी शाब्दिक चकमक झाली. जे कंट्रोलर आहेत, त्यांना डिपेंडंटच्या वजनाएवढे बॉक्स धरायला सांगितलेले. पण, समोर आलेल्या प्रोमोमध्ये काहीतरी भलतंच दिसलं. कंटेस्टंट योगेश रावत होस्ट रितेश देशमुखशी नडताना दिसतो. यामुळे रितेश भडकतो. योगेश म्हणतो, "सर, जर हेच करायचं होतं तर..." त्याचं म्हणणं पूर्ण होत नाही, तेवढ्याच रितेश देशमुखला राग अनावर होतो. आणि तो खूप चिडतो म्हणतो,"तू मला शिकवू नकोस... माझ्यासोबत हे नाटक चालणार नाही..."
शोमधून बाहेर पडलेत 'हे' स्पर्धक (Lock Up Season 2 Reality Show)
'लॉक अप 2' (Lock Upp 2) मध्ये नुकतंच डबल एव्हिक्शन पार पडलं. एकाच वेळी दोन स्पर्धकांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शनिवारी या रिअॅलिटी शोमधील दोन स्पर्धकांचा प्रवास संपला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रियाझ अली आणि गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांना या आठवड्यात शोमधून बाहेर काढण्यात आलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनीता आहुजा यांनी शो अर्धवट सोडला, तर रियाझला त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे शोमधून बाहेर पडावं लागलं. सुनीता आहुजा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, शोमध्ये प्रवेश केल्यापासून त्या सतत चर्चेत होत्या. त्यांच्या खेळालाही चांगली पसंती मिळत होती, पण त्यांनी नुकतंच सांगितलं की, त्या काही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत आणि त्यामुळे त्यांना शोमधून बाहेर पडण्याची इच्छा आहे.
'लॉक अप 2' मधील स्पर्धक (Lock Up 2 Contestants)
'लॉक अप 2' मधील स्पर्धकांचा विचार करता, यात टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावरील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. टीव्ही अभिनेते राम कपूर, शिल्पा शिंदे, शिवांगी जोशी आणि हर्षद चोपडा हे स्पर्धक म्हणून यात सामील झाले आहेत. तसेच, 'बिग बॉस 19' ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला ही देखील या शोचा भाग आहे. त्याचबरोबर, आकांक्षा चौधरी, योगेश रावत, श्रेया कालरा आणि सुफी मोतीवाला हे देखील त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आहेत. रितेश देशमुख आणि फराह खान हे या सीझनचे सूत्रसंचालन करत असून, हा शो नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रसारित होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
