Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि शिक्षण व्यवस्थेतील अव्यवस्था यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर इथे गेल्या महिन्यापासूनच विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session) पहिल्याच दिवशी संसदेच्या दिशेनं विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. यामध्ये अनेकजण जखमी झालेत. सोमवारच्या या घटनेचे पडसादर अगदी सभागृहामध्येही उमटले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करताच उपराष्ट्रपतींनी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. सोमवारच्या संघर्षाची झलक सोशल मीडियावरही पाहायला मिळाली. अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा दिला. अशातच आता महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणजेच, रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उघड पाठींबा दिलाय. 

Continues below advertisement

रितेश-जिनेलिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले? (Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Protest)

रितेश देशमुखनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन स्टोरी पोस्ट करत तरूणांच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिलाय. त्यानं पोस्ट करत म्हटलंय की, "आम्ही आपल्या देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज मोठ्यानं, स्पष्टपणे आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे... हे तरुण लोकच आपल्या लोकशाहीचं स्पंदन आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत..."

Continues below advertisement

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपल्या पोस्टमधून इतरांना आवाहनही केलंय. "चला, आपण त्यांचं ऐकुयात, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सक्षम करूया... आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्न... आपण घडवू इच्छित असलेल्या भारताला आकार देतील...", असं रितेश देशमुखनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच, आपल्या पोस्टच्या शेवटी रितेश देशमुखनं "जय हिंद..." असंही म्हटलंय. या पोस्टच्या शेवटी रितेशनं 'जिनेलिया आणि रितेश देशमुख' असं लिहिलंय. या पोस्टच्या शेवटी भारतीय तरुण, तरुणांचा आवाज आणि आपल्या देशाचं भवितव्य असे #YouthOfIndia , #VoiceOfTheYouth आणि #FutureOfOurNation हॅशटॅगही रितेश देशमुखनं वापरले आहेत.

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबतच इतरही अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शवला आहेत. इतकंच काय तर, अनेक सेलिब्रिटी सोमवारच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसरुद्दीन शाह, अभिनेते प्रकाश राज यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक मराठी कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केल्याचं दिसून आलं. सयाजी शिंदेंबरोबरच, शाल्मली खोलगडे आणि इतरही सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. किमान विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल