एक्स्प्लोर

सांगलीची राजकन्या साकारणार रितेश देशमुखच्या बहुचर्चित 'राजा शिवाजी’ चित्रपटात दमदार भूमिका

भाग्यश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. ती सांगलीच्या राजघराण्यातील राजकन्या आहे, ही बाब अनेकांसाठी आश्चर्याची आहे.

Raja Shivaji: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रभावी कामगिरी केलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन लवकरच ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. रितेश देशमुखच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात ती राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणार असून या भूमिकेबाबत तिने उत्साह व्यक्त केला आहे. ‘मुंटा’ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीनं भूमिका स्वीकारण्यामागचं कारण, तिची तयारी आणि सिनेमा निवडण्याचे निकष याबद्दल खुलासा केलाय.

राजा शिवाजी चित्रपटात महत्त्वाची भूमिका

भाग्यश्री सांगते की, कथा ऐकताच तिला ही भूमिका आपलीशी वाटली. जिजामाता या केवळ शूर स्त्री नव्हत्या, तर त्यांनी एका महान व्यक्तिमत्त्वाला घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. स्त्रीशक्तीचा व्यापक अर्थ दाखवणारी ही व्यक्तिरेखा असल्यामुळे तिनं लगेच होकार दिला. या भूमिकेसाठी तिनं पुन्हा इतिहासाचा अभ्यास केल्याचंही तिने सांगितलं.

काम स्वीकारताना भाषा कधीच अडथळा ठरत नाही, असं ती स्पष्ट करते. कथेतली भूमिका किती प्रभावी आहे, तिचं महत्त्व काय आहे आणि चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का, याचा ती बारकाईनं विचार करते. अनेक चांगले प्रकल्प पूर्ण होऊनही प्रदर्शित होत नाहीत, त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांची क्षमता तपासणंही तितकंच गरजेचं असल्याचं ती म्हणाली.

सकारात्मक संदेश देणाऱ्या कथांना प्राधान्य

आजच्या सिनेमांबद्दल बोलताना भाग्यश्री सकारात्मक संदेश देणाऱ्या कथांना प्राधान्य देत असल्याचं सांगते. प्रेक्षकांवर नकारात्मक परिणाम करणाऱ्या कथा ती टाळते. मनोरंजनासोबत सामाजिक जबाबदारीही महत्त्वाची असल्याचं तिचं मत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीबाबत बोलताना ती म्हणते की, उत्तम कथांची कमतरता नाही; मात्र दर्जेदार तंत्रज्ञानाची साथ मिळाल्यास मराठी सिनेमांची उंची आणखी वाढू शकते. ‘राजा शिवाजी’मधील आपल्या भूमिकेसाठी ती पूर्ण ताकदीने काम करत असल्याचंही भाग्यश्रीनं सांगितलं.

सांगलीची राजकन्या भाग्यश्री पटवर्धन

भाग्यश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. ती सांगलीच्या राजघराण्यातील राजकन्या आहे, ही बाब अनेकांसाठी आश्चर्याची वाटते. तिचा जन्म मुंबईत माधवराव आणि राज्यलक्ष्मी यांच्या घरी झाला. जन्मतः भाग्यश्री पटवर्धन नावाने ओळखली जाणारी ही अभिनेत्री महाराष्ट्रातील प्रतिष्ठित राजघराण्याशी संबंधित आहे.

भाग्यश्रीचे वडील विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांना आजही ‘सांगलीचे राजा’ म्हणून मान दिला जातो. राजघराण्याची परंपरा असतानाही भाग्यश्रीनं अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मार्ग निवडला. अभिनेत्री होण्याचं स्वप्न तिनं जिद्दीने पूर्ण केलं.

विशेष म्हणजे तिच्या पहिल्याच चित्रपटाने तिला जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली. सलमान खानसोबतचा तिचा पदार्पणाचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ प्रचंड गाजला आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या यशामुळे भाग्यश्री एका रात्रीत ती स्टार झाली.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget