Kantara chapter 1 x review:  ऋषभ शेट्टीचा  'कांतारा चॅप्टर 1 ' चित्रपटाच्या  एन्ट्रीनं सध्या चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या मिस्टिकल आणि लोककथेने समृद्ध विश्वात पोहोचवले आहे. या चित्रपटाला सध्या तुफान प्रतिसाद मिळतो आहे . 'कांतारा चॅप्टर 1'  हा प्रिकवेल असून मूळ ब्लॉकबस्टर कांताराची आधीची कथा दाखवली आहे . (Kantara: Chapter 1) आज सकाळपासूनच चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत . 'कांतारा चॅप्टर वन ' च्या first day first show साठी अनेकांनी या चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग काही दिवसांपूर्वी सुरू केले होते . चित्रपट आज प्रदर्शित झाल्याने चित्रपटाला सुट्टीचाही फायदा होणार आहे .

Continues below advertisement

ऋषभ शेट्टीने 2022 मध्ये आणलेला कांतारा ब्लॉकबस्टर ठरला होता . या चित्रपटापासूनच चाहत्यांनी या चित्रपटाच्या पुढच्या भागाची मागणी करायला सुरुवात केली होती .आता तीन वर्षानंतर ऋषभ या चित्रपटाचा प्रिकवेल घेऊन आला आहे .हा चित्रपट पाहून झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते रिसर्ब च आणि अर्थातच या सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहेत .या चित्रपटाला नक्कीच राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशी अपेक्षाही करताना दिसत आहेत .

 

Continues below advertisement

ऋषभ शेट्टी आपल्या मिस्टीकल विश्वात पुन्हा परतलाय .कांतारा चॅप्टर 1 या प्रिक्वेलमध्ये कांताराची कथा अधिक खोलवर उलगडली जाते . या कथानकात कांतारा राजमाता आणि नव्या राज्यारूढ बांगडा राजा कुलसेखरा यांच्यातील संघर्ष केंद्रस्थानी आहे .या चित्रपटाची सुरुवातच प्रेक्षकाला खिळवून ठेवते .

 

सोशल मीडियावर लोक कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत . एकाच चाहत्याने लिहिले, 'आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार लोड होतोय .. ऋषभ शेट्टीने पुन्हा कमाल केली' तर काहींनी लिहिले, यावेळी आणखी मजा आली . Kantara chapter 1 = Pure fire ! प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या ! तर एकाने लिहिले आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट क्लायमॅक्स पैकी एक ! ' कांतारा चॅप्टर 1 सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे .या चित्रपटाबद्दल सर्वत्र एकच चर्चा आहे .हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो असा बोलबाला आहे .