Rise And Fall: अश्नीर ग्रोव्हरचा (Ashneer Grover) रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल' (Rise And Fall) सध्या चर्चेत आहे. टीआरपीच्या रेसमध्येही हा शो सलमान खानच्या बिग बॉसला काँटे की टक्कर देत असल्याचं पाहायला मिळतंय. या शोमध्ये दररोज नवनवे ट्वीस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतायत. या शोच्या स्ट्रॅटेजीज, भांडणं आणि गेमप्ले प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. पण, या शोमधले कनेक्शन्सही प्रेक्षकांना हादरवून सोडतायत. सध्या एका व्हिडीओनं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ निक्की तांबोलीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल आणि युजवेंद्र चहलची घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील आहे, ज्यामध्ये अरबाज धनश्रीबाबत पझेसिव्ह होताना दिसतोय.
अरबाज पटेल सर्वात आधी मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसून आलेला. या शोमध्ये त्याची आणि निक्की तांबोळीची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरलेली. शोनंतरही दोघांमधील नातं टिकून होतं. दोघांचे हॉट, सिझलिंग, कोझी फोटोशूटही नेहमीच चर्चेचा विषय ठरलंय. अशातच आता अरबाज अश्नीर ग्रोव्हरचा रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल'मध्ये सहभागी झालाय. अशातच्या तो युजवेंद्र चहलची घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माबाबत काहीसा पझेसिव्ह होत असल्याचं पाहायला मिळतंय.
अरबाज पटेल व्हिडीओमध्ये धनश्रीला काय म्हणाला?
अरबाज पटेल धनश्री वर्माला अर्जुन आणि आरुषबद्दल विचारत होता. अरबाज धनश्रीला थेट म्हणाला की, "तू मुलांना थेट मिठी मारतेस का? साईड हग का करत नाहीस? यावर धनश्रीनं तात्काळ उत्तर दिलं की, "मी कधीच कुणाला साईड हग करत नाही, मी नेहमीच समोरून हग करते..." यानंतर अरबाज काहीच बोलत नाही, शांत बसतो. सध्या धनश्री आणि अरबाजमधल्या संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहे.
युजर्सच्या रिअॅक्शन्स...
अरबाजच्या या पजेसिव्ह होण्यावर सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "अरबाजचं वागणं भयानक आणि घृणास्पद आहे. आतापासून मी याला सपोर्ट करणार नाही..." दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "बिचारी निक्की... याला सर्वच मुलींसोबत असंच वागावं लागतं..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मला वाटलं होतं की, निक्कीसोबत असल्यानं प्रेमाचा अँगल नसेल, पण तरीही तो त्याच्या घाणेरड्या युक्त्यांचा अवलंब करतोय..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :