एक्स्प्लोर

Rinku Rajguru Share Kedarnath Experience: नास्तिक असणारी रिंकू राजगुरू 'त्या' एका चमत्कारिक प्रसंगानं पूर्ण बदलली; म्हणाली, 'मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते. पण...'

Rinku Rajguru Share Kedarnath Experience: नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरून अध्यात्माबाबत वक्तव्य केलं आहे. रिंकूनं यावेळी बोलताना सर्वात आधी मी नास्तिक असल्याचंही अगदी स्पष्टपणे सांगून टाकलंय.

Rinku Rajguru Share Kedarnath Experience: 'सैराट' (Sairat) सिनेमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकु राजगुरू (Actress Rinku Rajguru) उत्तम अभिनय आणि साधेपणासाठी ओळखली जाते. रिंकू राजगुरूनं 'सैराट' सिनेमातून अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आणि अल्पावधीतच तिनं मनोरंजनविश्वातल्या गुणी अभिनेत्रींच्या यादीत स्थान पटकावलं. ती नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असते. पण, सध्या रिंकू एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे, ते म्हणजे तिनं अध्यात्माबाबत केलेलं वक्तव्य. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरून अध्यात्माबाबत वक्तव्य केलं आहे. रिंकूनं यावेळी बोलताना सर्वात आधी मी नास्तिक असल्याचंही अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यासोबतच एकदा केदारनाथला गेली असताना तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेनं तिचं आयुष्य संपूर्ण बदलवून टाकलं, असंही ती म्हणाली. मुलाखतीत पुढे बोलताना रिंकून आपला अनुभवही सांगितलाय. 

अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आपला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू राजगुरूनं ती केदारनाथला गेली असतानाचा किस्सा सांगितला. त्यावेळी रिंकू राजगुरू म्हणाली की, "मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते. पण आयुष्यात अशा काही घटना घडल्या की, मी अध्यात्माकडे वळले. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. मग मी उपवास वगैरे करत गेले आणि मला त्याचे काही अनुभवही आले. खरंतर मी आता खूप त्या गोष्टींकडे वळले. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव यामागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. पण, एक कुठली तरी शक्ती आहे, जी तुम्हाला खेचते. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो किंवा मानायला लागतो. माझ्याबाबतीतही असंच झालं. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि मग मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटलं की आता इथेच एक ती आशा आहे आणि शांतता आहे. मला घरात सकाळी देवपूजा, जप करायला आवडतं. त्यामुळे मी स्वत:साठी ते करते".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Asha Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

पुढे बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली की, "मी गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी चालत केदारनाथला गेले होते. खूप थकले होते आणि पायही दुखत होते. दर्शन झाल्यावर मला वाटलं की, परतीच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर मिळावं, कारण दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईट होती. पण दोन-तीन तास वाट बघूनही हेलिकॉप्टर मिळेना. आम्हाला एक माणूस म्हणाला की, हेलिकॉप्टर मिळेल, आम्ही दोन-तीन तास थांबलो. वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदे. मी माझ्या कुटुंबासह दर्शनाला येईन. नंतर एक माणूस आला आणि म्हणाला की, आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते... चिडलेले..."

"त्या त्रासात मी देवाला म्हणाले की, 'हा काय देव आहे… काय ऐकतोय का… हेलिकॉप्टर पाहिजे म्हणाले, पण तेही करत नाहीय…' असं बोलत-बोलत पुढे जात होते, तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्यानं हेलिकॉप्टरबद्दल विचारलं. तो म्हणाला फक्त दोनच सीट आहेत. त्यानंतर मी आनंदात पळत पळत जात होते आणि इतक्यात जोरात पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं की, मी आता पुढे कधीच काहीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथेच शिक्षा मिळाली. आता हे कसं झालं काय झालं माहीत नाही. कारण खूप लोक वाट बघत होते आणि त्यापैकी फक्त आम्ही दोघीच त्या हेलिकॉप्टरमधून गेलो. म्हणून माझा विश्वास बसला की, ती एक शक्ती आहे...", असं रिंकूनं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही.. रिंकू राजगुरूने रिलेशनशिपविषयी सांगून टाकलं, सगळेच शॉक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Bigg Boss Actor Accident: रडत रडत गाडी चालवताना Insta Live केलं, बिग बॉस 17 फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, चाहत्यांची चिंता वाढली
रडत रडत गाडी चालवताना Insta Live केलं, बिग बॉस 17 फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, चाहत्यांची चिंता वाढली
Badshah Song Controversy: बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget