Rinku Rajguru Movie Better Half Chi Love Story teaser out : अभिनेत्री रिंकू राजगुरुचा नवा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Better Half Chi Love Story असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाच टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि प्रार्थना बेहरे यांच्या प्रमुख भुमिकेत असणार आहे. दरम्यान, सिनेमाचा टिझर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय. 

Continues below advertisement






Better Half Chi Love Story या सिनेमाचा टिझर अल्ट्रा मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. "बायको गेली…पण ड्रामा अजून बाकी आहे !!😂प्रेमाच्या गोंधळात खळखळून हसवायला येतेय ही आगळीवेगळी “बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ 💕हटके प्रेमकहाणीचा Teaser आलाय…🎬 पाहायला विसरू नका..चित्रपट “बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ 👉२२ ऑगस्टला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!", असं कॅप्शन या सिनेमाचा टिझर शेअर करताना देण्यात आलंय. 


अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली ती 2016 साली आलेल्या ‘सैराट’ या झी स्टुडिओ निर्मित चित्रपटातून. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात तीने ‘आर्ची’ ही भूमिका साकारली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तिला आर्ची म्हणूनच ओळखल जाऊ लागलं. ‘सैराट’ हा चित्रपट फक्त एक प्रेमकथा नव्हती, तर जातीभेद, सामाजिक विषमता आणि ग्रामीण जीवनातील कठोर वास्तव अधोरेखित करणारी कलाकृती होती. रिंकूने ‘आर्ची’च्या रूपात एका बंडखोर, धाडसी, प्रेमळ आणि तरीही मितभाषी मुलीचा चेहरा लोकांसमोर आणला. तिच्या डोळ्यांतील भाव, संवादफेक, देहबोली आणि अभिनयातील सहजता यामुळे प्रेक्षक भारावून गेले. एका नवोदित अभिनेत्रीने इतकी ताकदवान भूमिका साकारल्यामुळे तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


‘सैराट’च्या प्रचंड यशानंतर रिंकूने आपलं शिक्षण सोडून दिलं नाही, तर अभिनयासोबतच शैक्षणिक प्रगतीही साधत राहिली. यामधून तिच्या कुटुंबीयांच्या आणि तिच्या स्वतःच्या मूल्यांची झलक दिसते. पुढे तिने काही मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘कागर’ (2019) या चित्रपटातून तिने एक राजकारणात येणाऱ्या तरुणीची भूमिका साकारली. यामधूनही तिच्या अभिनयातील परिपक्वता जाणवली.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


VIDEO : साई पल्लवीचा 'अप्सरा आली'वर जबरदस्त लावणी डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ


Amitabh Bachchan Aamir Khan Cars Fined 38 Lakh: अमिताभ बच्चन, आमिर खानला RTO चा मोठा दणका, 38 लाखांचा दंड ठोठावला; अब्जाधीश बिझनेसमनच्या एका चुकीमुळे बॉलिवूड सुपरस्टार्स वादाच्या भोवऱ्यात