Bigg Boss Marathi Season 6 three wild card entries: बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात 1, 2 नव्हे तर तीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके यांच्या धडाकेबाज एन्ट्रीमुळे आता या खेळात अधिक रंगत येणार, यात तीळमात्र शंका नाही. रेवा कौरासेनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच रुचिता जामदारशी पंगा घेतला. संकेत पाठकची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच त्याचं रितेश देशमुखकडून कौतुक झालं. दरम्यान, तिघांची एन्ट्री होताच प्राजक्ता शुक्रेची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार्या सदस्यांचा नवीन गेम स्ट्रॅटजी आहे तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, तिघांमुळे बिग बॉसच्या घरात कोणते बदल होणार? हे लवकरच समोर येईल.
बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य आल्याने, सगळी समीकरणं बदललेली दिसून येत आहेत. कलर्स मराठीनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. .या प्रोमो व्हिडिओमध्ये रेवा, संस्कृती आणि संकेतमध्ये चर्चा होत असते. चर्चा सुरु असताना संस्कृती म्हणते,'ही लोक एवढी घरात मजाक उडवत आहेत वाईल्ड कार्ड - वाईल्ड कार्डची.. तर माज किती आला आहे त्यांना, दिसत नाहीये का? ते लोक आपल्याला तोंडावर बोलत आहेत..' यावर रेवा म्हणते, 'Its Time To Proove ! आपण चावी गमावली आहे ना ? मग आता खेळ बस..', असं म्हणते. संकेत पाठक हे सगळं ऐकतो. तिघांमध्ये अधिक चर्चा रंगते.
सध्या तिघांच्या चर्चेचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या कलाकारांमध्ये काही शिजतंय का? तिघांमध्ये नवीन गेम स्ट्रटजी तयार होत आहे का ? हे लवकरच समोर येईल. बिग बॉसच्या घरात पुढे नेमकं काय होणार? हे लवकरच उघड होईल. दरम्यान, या आठवड्यात कुणावर एलिमिनेशनची टांगती तलवार असणार, कोण बिग बॉसच्या घरातून बेघर होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
इराण म्हणजे नरक, महिलांवर जनावरांसारखे अत्याचार, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्लाबोल
