Reva Kaurase wild card entry in Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी सिझन 6ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. सध्या बिग बॉसमध्ये सातवा आठवडा सुरु आहे. सहा आठवड्यात बरेच स्पर्धक एलिमिनेट झाले. या शोमध्ये अनेपक्षित ड्रामा क्वीन राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. यानंतर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळाली. सहा आठवड्यात बरेच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले. एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांना एलिमिनेट करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चा सुरु असतानाच, पुढील आठवड्यात बिग बॉसच्या घरात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका नव्या सदस्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.
टेलीचक्करच्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या घरात एका नवीन सदस्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. सुत्रांनुसार, बिग बॉसच्या घरात अभिनेत्री रेवा कौरसे हिची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवा कौरसेची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या अभिनेत्रीनं आतापर्यंत दिवानियत, प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवा कौरसे बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी सज्ज आहे. ती लवकरच बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल. मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यातील भाऊचा धक्का या एपिसोडनंतर शोमध्ये प्रवेश करु शकते.
आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला आहे. राधा पाटील, सोनाली राऊत, ओंकार राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव आणि सचिन कुमावत यांना बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट करण्यात आले आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर बिग बॉसच्या घरात अक्षरश: धुमाकूळ उडाला. आता या घरात विशाल कोटियन, अनुश्री माने, तन्वी कोलते, रुचिता जमादार आणि राकेश बापट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. राखी सावंत देखील उत्तमरित्या टास्क खेळत आहे. अशातच आणखी एका स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. रेवा कौरसे बिग बॉसच्या घरात एन्ट्रीसाठी सज्ज असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरातून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिग बॉस मराठीच्या टीमकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, बिग बॉसच्या घरात नेमकं कोण वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
