Lataa Saberwal Separation From Sanjeev Seth: लग्नाच्या 15 वर्षांनी लता सभरवाल (Lataa Saberwal) आणि संजीव सेठ (Sanjiv Seth) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत, आपण घटस्फोट (Divorce) घेत असल्याचं जाहीर केलं. पण, घटस्फोट जरी लता सभरवाल आणि संजीव सेठ यांचा होत असला तरीसुद्धा यामुळे चर्चेत मात्र एक मराठी अभिनेत्री आली आहे. तिचं नाव रेशम टिपणीस (Resham Tipnis).

रेशम टिपणीस ही मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक निर्णयांमुळे चर्चेत आली आहे. लता सभरवालचे पती संजीव सेठ हे रेशम टिपणीसचे पहिले पती. खूप लहान वयात 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेते संजीव सेठ यांच्यासोबत रेशमनं आपली लग्नगाठ बांधली आणि सुखी संसार थाटला. पण लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर रेशमला तिच्या पतीच्या अफेअरबद्दल कळालं, त्यानंतर तिनं स्वतः आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलेलं. 

रेशम टिपणीसनं एवढा त्याग करुन आपल्या पतीचं लावलेलं दुसरं लग्नही मोडलं. लता सभरवाल आणि संजीव सेठ यांनी लग्नाच्या 15 वर्षांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लता सभरवाल यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले की, ती तिचा पती संजीव सेठपासून वेगळी झालीय. पोस्टमध्ये तिनं लिहिलेलं की, "दीर्घ काळ शांत राहिल्यानंतर, मी जाहीर करते की मी माझ्या पतीपासून वेगळे झालो आहे. मला एक सुंदर मुलगा आहे मी त्यांचे आभार मानते. मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते."

लता सभरवाल यांच्या पोस्टनंतर संजीव सेठ आणि रेशम टिपणीस यांच्या पहिल्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. तसं पाहिलं तर रेशम टिपणीस आणि तिचं पहिलं लग्न नेहमीच चर्चेत राहिलं आहे. रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळीही तिच्या पहिल्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. 

1993 मध्ये बांधली लग्नगाठ 

रेशम टिपणीसनं 1993 मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता संजीव सेठशी लग्न केलं. लग्नानंतर काही वर्ष त्यांचा सुखी संसार सुरू होता. रेशम आणि संजीव यांना दोन मुलं झाली. पण, काही वर्षांच्या सुखी संसारानंतर रेशमच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर रेशमला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा-मॅरेटियल अफेअरबाबत कळालं. त्यानंतर 2004 मध्ये संजीव आणि रेशम यांचा घटस्फोट झाला. 

स्वतःच लावून दिलं पतीचं दुसरं लग्न 

रेशमला आपल्या पतीच्या अफेअरबाबत कळातच तिनं पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली. एवढ्यावरच ती थांबली नाहीतर तिनं त्याला दुसऱ्या लग्नाच्या तयारीसाठी मदतही केली. एवढंच नाहीतर तिनंच आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं.  रेशमसोबत घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच संजीव सेठ यांनी लता सभरवालसोबत आपली लग्नगाठ बांधली. घटस्फोटाचा पश्चाताप झाल्याचं रेशमनं 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

मुलाखतीत बोलताना रेशम नेमकं काय म्हणालेली? 

एका मुलाखतीत बोलताना रेशम म्हणालेली की, "लग्न झालं तेव्हा मी 20 वर्षांची होते. लगेच गरोदर राहिले, आई झाले. घराची, मुलांची जबाबदारी सांभाळण्यासाठी खरं तर मी इतकी सक्षम नव्हते, तितकी समजही माझ्यात नव्हती. माझ्या आणि संजीवच्या वयात तब्बल 12 वर्षांचं अंतर होतं." पुढे बोलताना रेशम म्हणाली की, "जर आम्ही दोघे तितके मॅच्युअर असतो, तर कदाचित आमच्यात जे काही झालं ते घडलंच नसतं. मॅच्युअर असतो तर आम्ही घटस्फोट घेतलाच नसता, असंही ती म्हणाली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Top Actress Want Her Blouse Tight: 'माझा ब्लाऊज जरा टाईट शिवा...', बिग बींसोबतचा रोमँटिक सीन शूट करण्यापूर्वी हेमा मालिनींनी घातलेली भलतीच अट