Renuka Shahane On Laxmikant Berde: हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film Industry) आपल्या साध्याभोळ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांना आपलंसं करणारं नाव म्हणजे, रेणुका शहाणे (Renuka Shahane). आजवर त्यांनी अनेक सिनेमे (Movies) केले. सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षितसोबतच्या (Madhuri Dixit) 'हम आपके है कौन'मधली (Hum Aapke Hain Koun..!) रेणुका शहाणे यांची भूमिका खूप गाजली. आता लवकरच कित्येक वर्षांनी रेणुका शहाणे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आगामी सिनेमा 'उत्तर'मध्ये एकत्र झळकणार आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना रेणुका शहाणे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या अनुभवांबद्दल नुकत्याच काही आठवणी शेअर केल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्यासोबत धाकट्या बहिणीसारखे वागायचे आणि कठीण प्रसंगी त्यांना धीर द्यायचे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंनी लेकाचं नाव अभिनय का ठेवलं? याचा एक भन्नाट किस्साही सांगितला.
रेणुका शहाणे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा किस्सा सांगताना काय म्हणाल्या?
रेणुका शहाणेंनी 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. लक्ष्याला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा लक्ष्यानं त्याचं नाव अभिनय ठेवलं. लक्ष्यानं ही गोष्ट रेणुका शहाणेंना सांगितली. रेणुका शहाणेंनी लक्ष्यानं ठेवलेल्या नावाचं कौतुक केलं. पुढे लक्ष्यानं हे नाव ठेवण्यामागचं कारण रेणुका यांना सांगितलं. लक्ष्या म्हणाला की, "सगळे म्हणतील, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे..."
रेणुका शहाणेंनी पुढे बोलताना सांगितलं की, "कुठेतरी कॉमेडी करता करता कलाकाराला तेवढा सन्मान मिळत नाही. दुर्दैव आहे हे... कारण कलाकार म्हणून कॉमेडी करणं खूप कठीण आहे. पण जे ड्रामाटिक कलाकार असतात त्यांच्याबद्दल एक वलय असतं की, उत्तम कलाकार आहेत वगैरे... लक्ष्यानं इमोशनल भूमिका सुद्धा खूप अप्रतिम केल्या आहेत. पण त्याला वाव मिळाला नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी वाटलं की, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे, मस्त आहे..."
दरम्यान, रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उत्तर' या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहेत, तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट नेमकी आहे तरी काय? याचं 'उत्तर' रसिकांना येत्या 12 डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :