Chitra Iyer’s Sister Sharada Iyer Passes Away: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  प्रसिद्ध मल्याळम आणि तामिळ चित्रपट गायिका चित्रा अय्यर यांच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. शारदा अय्यर (वय वर्ष 54) असे चित्रा अय्यर यांच्या  बहिणीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी शारदा अय्यर जेबेल  शम्स परिसरात ट्रेकिंग  करण्यासाठी गेले होते. ट्रेकिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. अपघाती त्याचं निधन झालं.  मिळालेल्या माहितीनुसार,  मस्कटमध्ये राहणाऱ्या भारतीय प्रवासी शारदा अय्यर केरळमधील थाझावा येथील रहिवासी आहेत. शारदा अय्यर यांच्या मृत्यू  अय्यर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. 

Continues below advertisement

ट्रेकिंग करताना मृत्यू

शारदा अय्यर ओमानची राजधानी मस्कत येथे राहत होत्या. त्या ओमान एअरच्या  माजी व्यवस्थापक होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, शारदा अय्यर कोल्लम जिल्ह्यातील थाझावा येथील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी शारदा अल दखिलियाह गवर्नरेंट स्थित जेबेल शम्स परिसरातील एका ट्रेकिंग ग्रुपसोबत गेले होते.  हा परिसर धोकादायक पायवाटांसाठी ओळखला जातो. ट्रेकिंग करत असतानाच त्यांचा अपघात झाला असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप  मृत्यूचे कारण निश्चित केलेले नसले तरी,  प्राथमिक माहितीनुसार, हा दुर्देवी अपघात असल्याची माहिती आहे. 

चित्राने शारदाच्या आठवणीत केली पोस्ट शेअर

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेबेल शम्सचा वाडी घुल परिसर टेकर्समध्ये लोकप्रिय आहे.   परंतु,  हा भाग धोकादायक मानला जातो. कोणतीही चूक गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते.  दरम्यान, बहिणीच्या मृत्यूनंतर गायिका चित्रा अय्यरने सोशल मीडियावर एका भावनिक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये तिने बहिणीला गमावल्याचे दु:ख व्यक्त केले. इन्स्टाग्रामवर तिने लिहिले की,  "माझी छोटी खोडकर बहीण. तू नेहमीच माझ्यापेक्षा वेगाने धावत होतीस.  पण मी तुला लवकरच पकडेन. मी तुला वचन देते. तुला खूप प्रेम...", 

"आता मी तुमच्याशिवाय कशी जगणार? तुझा आवाज, सतत बोलत राहणे,  किंवा  दुसऱ्या खोलीतून ओरडणे.. आता याच्याशिवाय मी कसं सहन करू?". अशी पोस्ट तिने सोशल मीडियात शेअर केली.सोमवारी  चित्राने आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं शारदा यांचे पार्थिव  ओमानहून केरळला परत आणले जात असल्याची माहिती दिली. शारदा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 7 जानेवारी रोजी थाझावा येथे होणार आहे.  या घटनेनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.