Bollywoods Oldest Kissing Controversy: चित्रपटसृष्टीत सध्या बऱ्याच चित्रपटांमध्ये किसिंग किंवा इंटीमेट सीन्स दाखवले जातात. या सीन्सची चर्चा देखील होते. बऱ्याचदा इंटीमेट सीन्समुळे वाद देखील होतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममधील वेब सिरीजमध्ये सर्रास किसिंग आणि इंटीमेट सीन्स दाखवले जात आहेत. परंतु, पूर्वीच्या चित्रपटांमध्ये किसिंग आणि इंटीमेट सीन्सचे प्रमाण कमी होते. पूर्वी किसिंग सीनला टॅब्यू टॉपिक मानले जात होते. परंतु, पूर्वीच्या एका चित्रपटातील किसिंग सीनची चर्चा आजही होते. 55 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात किसिंग सीन दाखवण्यात आला होत. या चित्रपटात अभिनेता नकळत अभिनेत्रीला किस करत राहिला. पण त्यानंतर अभिनेत्रीला रडू कोसळलं. त्या सीनदरम्यान नेमकं काय घडलं?जाणून घेऊयात.
'अंजाना सफर' या चित्रपटाची किसिंग सीनमुळे चर्चा
70च्या दशकातील चित्रपटात रोमॅण्टिक सीन दाखवताना एक फूल किंवा हंसांची जोडी दाखवण्यात यायचे. तेव्हा चुंबनाचे दृष्य उघडपणे दाखवली जात नव्हती. मात्र, 55 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'अंजाना सफर' या चित्रपटात किसिंग सीन दाखवण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत्री रेखा आणि विश्वजीत चॅटर्जी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याकाळी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. किसिंग सीनमुळे हा चित्रपट खूप गाजला होता. दरम्यान, या किसिंग सीनचा उल्लेख पत्रकार यासिर उस्मानद्वारे लिखित रेखा यांच्या बायोपिक 'रेखा द: अनटोल्ड स्टोरी' मध्ये करण्यात आला आहे.
किसिंग सीन नंतर रेखाला रडू कोसळलं
दिग्दर्शक राजा नवादे यांनी किसिंग सीनसाठी अॅक्शन म्हणताच, अभिनेता विश्वजीत यांनी रेखा यांच्या ओठांवर चुंबन घेण्यास सुरूवात केली. 5 मिनिटांनंतर दिग्दर्शकाने या दृश्यासाठी कट म्हटले. तेव्हा अभिनेता थांबला. दरम्यान, या दृश्यानंतर अभिनेत्रीला रडू कोसळलं. असं म्हटलं जातं की, रेखा यांना या सीनबाबत माहिती देण्यात आली नव्हती. म्हणूनच रेखा आणि विश्वजीत चॅटर्जी यांच्यात चित्रित केलेला हा लिपलॉक दृश्य बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त किसिंग सीनपैकी एक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,'अंजाना सफर' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने मंजूर करण्यापूर्वी 10 वर्षे रोखून धरला होता. नंतर या चित्रपटाचे शीर्षक बदलल्यानंतर, हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सीनमुळे 'अंजाना सफर' या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली होती. त्या काळी हा चित्रपट गाजला. या सीनबाबत आजही सिनेसृष्टीत चर्चा होते.