Prathamesh Kadam Mother Pradnya Kadam Shares Emotional VIDEO: रिलस्टार प्रथमेश कदमची आई अफवांमुळे हतबल, मुलाच्या निधनाचं खरं कारण सांगताना अश्रू अनावर; म्हणाली...
Prathamesh Kadam Mother Pradnya Kadam Shares Emotional Video: प्रथमेशच्या आईनं कॅमेऱ्यासमोर येऊन सर्व प्रश्नांना उत्तर दिलंय. तसेच, प्रथमेशच्या निधनाचं खरं कारणंही सर्वांना सांगितलं आहे.

Prathamesh Kadam Mother Pradnya Kadam Shares Emotional Video: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं (Social Media Influencer Prathamesh Kadam) 26 जानेवारी रोजी निधन झालं. आपल्या लाडक्या इन्फ्लुएन्सरचं असं अचानक जाणं, त्याच्या चाहत्यांसह सर्वांच्याच मनाला चटका लावणारं ठरलं. धडधाकट दिसणाऱ्या प्रथमेशला नेमकं झालं काय? तो अचानक आपल्या सर्वांमधून कसा निघून गेला? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. प्रथमेशच्या निधनानंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्यामुळे प्रथमेशच्या निधनाबद्दल अनेक अफवा पसरल्या आणि चर्चांना उधाण आलं. आता प्रथमेशच्या आईनं हतबल होऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रथमेशच्या आईनं कॅमेऱ्यासमोर येऊन सर्वांना उत्तर दिलं आहे. तसेच, प्रथमेशच्या निधनाचं कारणंही सर्वांना सांगितलं आहे.
रिलस्टार प्रथमेश कदमची आई शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय म्हणाली?
रिलस्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आता त्याच्या आईनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये प्रथमेशची आई प्रज्ञा कदम म्हणाल्या की, "नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम. प्रथमेशची मम्मी. काही दिवसांपासून मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता. असे व्हिडिओ येत होते की, प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं,ते झालं. असं काहीही झालं नव्हतं त्याला. खरं कारण त्याचं एकच होतं की, त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते ती कोणालाही कळत नाही. डॉक्टरांनी मला खात्री दिली होती, जेव्हा मी त्याला अॅडमिट केलं. डॉक्टर बोलले दोन-तीन दिवसात तो कव्हर होईल. रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. पण कावीळने घात केला माझ्या मुलाचा..."
View this post on Instagram
"डॉक्टरांना पण नाही कळालं. शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळतंय की, त्याच्या रक्तामध्ये सफेद कावीळ झाली होती. डॉक्टर बोलले, आपण बघूया... पूर्ण शरीरभर त्याच्या ती रक्ताची कावीळ मिसळली होती. तेव्हा डॉक्टर मला बोलले, आता तुम्ही देवाला प्रार्थना करा. तेव्हा मी खचून गेली... मी म्हटलं आता काही गॅरंटी नाही माझ्या मुलाची. ती कावीळ पूर्ण रक्तामध्ये मिसळली की, माणसाचं शेवटी मृत्यू होतो, आणि तेच झालं. 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशनं जगाचा निरोप घेतला...", असं रिलस्टार प्रथमेश कदमची आई म्हणाली.
"मला खूप त्रास झाला. जेवढे त्याचे चाहते आहेत, त्या सर्वांना खूप त्रास झाला. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणी काही बोलेल त्याच्यावर लक्ष देऊ नका. प्लीज आम्हाला, मला-माझ्या मुलीला मेसेज करुन विचारू नका, की काय आणि कसं झालं ते? तुमचा जो गैरसमज होता, तो मी आता दूर केलाय. प्रथमेशचं फक्त रक्तातल्या कावीळमुळे निधन झालं. बाकी त्याला काहीही नव्हतं. त्यामुळे प्लीज कोणती अफवा पसरवू नका...", असं रीलस्टार प्रथमेश कदमची आई म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























