Splitsvilla Controversy Heats Up: स्प्लिट्सव्हिला (Splitsvilla) हा कॉन्ट्रोवर्शियल  शो आहे. बिग बॉसप्रमाणे या शोमध्ये बरेच वादविवाद होतात.  स्प्लिट्सव्हिलाचा सहावा सिझन सुरु आहे. या सिझनमध्ये बरेच वादविवाद आणि राडे पाहायला मिळतात. दरम्यान, स्प्लिट्सव्हिलामधील वातावरण तापलं आहे.  आकांक्षा चौधरी (Akanksha Chaudhary) आणि दीक्षा पवार (Diksha Pawar) या दोघींमध्ये जोरदार भांडण झालं आहे.  आकांक्षाने दीक्षावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं यातून आपली बाजू स्पष्ट केली आहे.  दीक्षाने हिलच्या सँडलने मारलं,  ओठातून रक्त येत होतं, गंभीर दुखापत झाली, असं  आकांक्षाने म्हटलं आहे. 

Continues below advertisement

आकांक्षाने आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी  एक पोस्ट शेअर केली, 'हे केवळ भांडण नव्हते, तर हिंसा होती.  मला हिल्सने मारलं. मला इतकं मारलं की माझ्या ओठातून रक्त येऊ लागलं.  माझ्या डोळ्यांखाली जखमा आहेत.  मानेवर ओरखडे आहेत. यातून रक्त येऊ लागलं आहे.  हे सगळं नॅशनल टीव्हीवर घडलं.   हा फोटो घटनेच्या 10-15 दिवसांनंतर काढला. मला जेव्हा व्हिलातून मोबाईल मिळाला, तेव्हा मी हे फोटो काढू शकले. जेव्हा मारहाण झाली तेव्हा जखम ताजे होते',  असं आपल्या पोस्टमध्ये आकांक्षा म्हणाली.

आकांक्षाने पोस्ट शेअर करुन आपबिती सांगितली (Akanksha Chaudhary Instagram post about assault in Splitsvilla)

 

Continues below advertisement

'तरीही लोक म्हणतात, की माझ्या शरीरातून रक्त आलंच नाही.  कल्पना करा मी हे सगळं सहन केलंय.  हे सगळं एक खोट्या गोष्टीने, एका लेबलने आणि मला वाईट दाखवण्यासाठी रचलेल्या एका स्टोरीतून सुरु झालं आहे. आजही याची चर्चा सुरु आहे.  जेव्हा लोक माझ्याबद्दल नरेटिव्ह तयार करत होते, तेव्हा मी या जखमांसोबत  जगत होते',  असं आकांक्षा म्हणाली.

'त्या दिवशी माझ्या आत काहीतरी जोरात तुटलं. मला सुन्न आणि एकटं वाटत होतं.   मला तिथून निघून जायचं होतं. मी गेलेही.. पण मी पळून  जाणाऱ्यांपैकी नाही.  मी आता कोणत्याच गोष्टींसाठी तयार नाही.  मी कोणतीच प्रतिक्रिया देत नाही',  असे तिने म्हटलं आहे.  स्प्लिट्सव्हिलामध्ये दीक्षा आणि आकांक्षा यांच्यात जोरदार  भांडण झालं.  भांडण मारहाणीपर्यंत पोहोचलं होतं.   सनी लिओनीनंही यावर  तीव्र  नाराजी व्यक्त केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महाराष्ट्राच्या क्रशचा समर लूक; रेडीश ब्राऊन रंगाच्या ड्रेसवर दिसते कमाल, फोटोंवर चाहते घायाळ