Raveena Tandon Dog Video: बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनसोबत (Raveena Tandon) गुरुवारी रात्री मुंबईतील एका कार्यक्रमात भयंकर घडलं. अभिनेत्री अमित राय दिग्दर्शिक 'ओह माय डॉग'च्या (Oh my Dog) स्क्रिनिंगसाठी गेली होती. पंकज त्रिपाठी आणि माही राय स्टारर हा सिनेमा माणूस आणि श्वान यांच्यातील इमोशनल स्टोरीवर आधारीत आहे. या सिनेमाच ऑस्कर आणि ब्रूनो या दोन्ही कुत्र्यांनीही काम केलं आहे. स्क्रिनिंगमध्ये बरेच कलाकार उपस्थित होत. जेव्हा रेड कार्पेटवर रविना टंडन पापाराझींसमोर पोझ देत होती, तेव्हा तिच्यासोबत भयंकर घडलं. एक कुत्रा रविना टंडनच्या अगदी जवळ आला. त्याने अभिनेत्रीचा ड्रेस धरला. सोशल मीडियात (Entertainment) याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये रविना टंडनचा कुत्र्याने चावा घेतला का? असा सवाल उपस्थित करत आहेत.
रविना टंडनचा व्हिडीओ व्हायरल (Raveena Tandons Video gets viral after dog grabs her dress)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, पापाराझींसमोर पोझ दिल्यानंतर रविना तिच्या जवळ असणाऱ्या डॉगी ब्रूनोसमोर हात पुढे करते. यावेळी ब्रूनो खूप खूश होतो. यानंतर ब्रूनो रविना टंडनचा ड्रेस पकडण्याचा प्रयत्न करतो. रविनाच्या ड्रेसला एक दोरी असते, ब्रूनो ती दोरी ओढू लागतो. अचानक झालेल्या गोष्टीमुळे रविना घाबरली नाही. तिने ब्रूनोला झटका देत हकलवलं नाही. तर, शांतीने परिस्थिती सांभाळली. तसेच प्रेमाने ब्रूनोला कुरवाळलं. यावेळी ब्रूनो भुंकला, पण रविना घाबरली किंवा कुत्र्याला ओरडली नाही.
यानंतर पापाराझींनी तिची विचारपूस केली. त्यावेळी रविना टंडनने, 'मी ठीक आहे', असं सांगितलं. रविनाने सांगितलं की, 'कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला नाही. उलट ब्रूनो उत्साहित होता. हे त्याची प्रेम करण्याची पद्धत आहे', असं रविना म्हणाली. माहितीनुसार, रविना टंडन ही एक अॅनिमल लव्हर आहे. तिचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे. प्राण्यांसाठी अभिनेत्री नेहमी आवाज उठवते. या वर्षीच्या सुरुवातीलाही अभिनेत्रीने, भरपावसात हायवेवर अडकलेल्या कुत्र्याची सुटका केली, तसेच तिने सुटकेची स्टोरी सांगितली. तिने व्हिडीओत सांगितलं होतं की, कशापद्धतीने तिने कुत्र्याची सुटका केली आणि वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडे सोपवलं. अभिनेत्रीचं प्रचंड कौतुक करण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
