Apurva Nemlekar Tie Knot On Valentines Day: मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. बऱ्याचजणांनी आपापला जोडीदार निवडला असून लग्नाची तयारी सुरू केली आहे. अशातच 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंतानं आपली लग्नगाठ बांधली आहे. अपूर्वा नेमळेकरनं (Apurva Nemlekar) सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे.                          

Continues below advertisement

'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरनं व्हेलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच, 14 फेब्रुवारी रोजी तनुज गोवळकरसोबत आपली लग्नगाठ बांधली. अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन अपूर्वानं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केलीय. अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांसोबतच मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.                  

अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली?

अपूर्वा नेमळेकरनं लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलंय की, "24 फेब्रुवारी 2026 अशी एक तारीख जी कायमस्वरुपी आमची झाली. या खास दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातील जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एक नवीन अध्याय सुरू केला. मला तुम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की, आता मी मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर' आहे. आयुष्याने माझी अनेकदा परीक्षा घेतली, यादरम्यान मी अनेक चढउतार अनुभवले आणि तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवले नाही. आयुष्यात एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही आणि अखेर देवाने माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या."

Continues below advertisement

"ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे... समजूतदारपणे आणि अतिशय आदरपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायम सोबत राहूद्यात.... माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आज मी प्रचंड आनंदी अन् कृतज्ञ आहे. With Love, मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर...", असं अपूर्वानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rashmika Mandana Vijay Deverakonda Wedding Streaming Rights: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाची लगीनघाई; कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? Netflix ची मोठी ऑफर