Rashmika Mandanna Vijay Deverakonda Confirm Wedding: जब मियां बीबी राजी... रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाची लगीनघाई, जाहीरपणे दिली कबुली; लग्नपत्रिका पाहिलीत?
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Confirm Wedding: साऊथमधलं सुपर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा याच आठवड्यात उदयपूर इथल्या एका खाजगी समारंभात लग्नबंधनात अडकणार आहेत.

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Confirm Wedding: साऊथ इंडस्ट्रीतलं (South Film Industry) सुपरस्टार जोडपं रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलेलं. पण, दोन्ही सुपरस्टार्सनी याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नव्हतं. अखेर आता दोन्ही सेलिब्रिटींनी आपल्या लग्नाचं कन्फर्मेशन दिलं आहे. तसेच, एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची कबुलीही दिली आहे.
साऊथमधलं सुपर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा याच आठवड्यात उदयपूर इथल्या एका खाजगी समारंभात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांनी अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली तरी, त्यांनी रविवारी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून दोघेही लग्न करणार असल्याची कबुली दिली.
![]()
रश्मिका विजयनं काय म्हटलंय?
रश्मिका आणि विजयनं शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिलेलं की, "आमच्या प्रिय मित्रांनो, आम्ही कोणताही प्लान बनवण्यापूर्वी, स्वतःसाठी काहीही निवडण्यापूर्वीच... तुम्ही आधीपासूनच आमच्यासोबत होता, तुम्ही आम्हाला प्रेमानं एक नाव दिलं... तुम्ही आम्हाला 'विरोष' म्हटलं... म्हणूनच आज आम्ही मनापासून तुमच्या सन्मानार्थ आमचं हे मिलन समर्पित करतो..." तसेच, दोघांनी स्टोरीवर शेअर केलेल्या कार्डवर पुढे लिहिलंय की, "आम्ही या सोहळ्याला 'विरोष की शादी' असं म्हणणार आहोत... आमच्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल धन्यवाद... तुम्ही नेहमीच आमच्यासोबत राहाल... खूप प्रेम...!"
रश्मिका, विजयचं लग्न कधी?
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला. आता दोघांची लगीनघाई सुरू झाली असून दोघेही 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये आपला साखरपुडा उरकला. 'गीता गोविंदम' (2018) आणि 'डियर कॉम्रेड' (2019) मध्ये एकत्र दिसल्यापासूनच प्रेक्षकांना ही जोडी खूप भावलेली. त्यानंतर काही दिवसांतच दोघांचं सूत जुळल्याचंही बोललं जात होतं. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच कुठेच कबुली दिली नव्हती. अखेर आता दोघेही आयुष्यभराच्या बंधनात अडकणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























