Rashmika Mandanna: दक्षिणेतील सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना (RAshmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda)ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चांना फार काळ झाला असला तरी आता रश्मिकाच्या एका वक्तव्याने या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. एका कार्यक्रमादरम्यान रश्मिकाने सगळ्यांसमोरच स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “मी विजयशी लग्न करेन!” आणि तिचं हे उत्तर ऐकताच उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
अलीकडेच एका ऑनेस्ट टाउनहॉल इव्हेंटमध्ये रश्मिकाला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला, “तुम्ही ज्या अभिनेत्यांसोबत काम केलं, त्यांच्यापैकी कोणाला तुम्ही डेट कराल, कोणाशी लग्न किंवा कोणाला माराल?” यावर ती हसत म्हणाली, “मी नारुतोला डेट करेन, कारण मी त्याच्यासाठी वेडी आहे. आणि विजय देवरकोंडाशी लग्न करेन!” तिचं हे उत्तर ऐकून सर्व चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या उत्तराचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी हॅशटॅग ट्रेंड करायला केली सुरुवात
रश्मिकाला नारुतो आणि ऍनिमे सिरिजचं प्रचंड वेड आहे. तिने सांगितलं, “मी फक्त ऍनिमेच पाहते. मी नारुतो पाहत मोठी झाले आहे. या शोचे सुमारे 600 एपिसोड आहेत आणि मी सगळेच पाहिले आहेत.” तिच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी “#RashmikaWedsVijay” असे हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजय यांच्या साखरपुड्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, हे दोघं पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे. मात्र, दोघांच्या टीमकडून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही चाहत्यांमध्ये “साउथ सिनेमाच्या सर्वात गोंडस जोडप्याचं लग्न” या चर्चांना उधाण आलं आहे.
कोणत्या सिनेमात झळकणार रश्मिका?
रश्मिकाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळवत आहे. त्यानंतर ती ‘कॉकटेल 2’ या चित्रपटात सैफ अली खान आणि कृति सेनन यांच्यासोबत झळकणार आहे. याशिवाय, ती लवकरच शाहिद कपूरसोबतही पहिल्यांदाच काम करणार आहे. सध्या तिचं लव्ह लाइफ आणि चित्रपट करिअर दोन्ही गतीत असून, तिचं “मी विजयशी लग्न करेन!” हे वक्तव्य इंटरनेटवर तुफान व्हायरल झालं आहे. “रश्मिका आणि विजय खरंच लग्नबंधनात अडकणार का?” हा एकच प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.