Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे त्यांच्या पारंपारिक  आणि भव्य लग्नासाठी चर्चेत आहे.  त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. या जोडप्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  दोघांना त्यांचे चाहते खूप महत्त्वाचे आहेत.  लग्नानंतर विविध शहरातील चाहत्यांमध्ये त्यांनी मिठाई वाटप देखील केली होती.  दोघांचं लग्न झाल्यामुळे चाहते खूप आनंदात होते. मात्र,  एका लहान चाहतीला  लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते. तिला मिठाई न मिळाल्यामुळे  ती छोटी फॅन प्रचंड नाराज झाली होती.  पण रश्मिका आणि विजयने मिळून तिची नाराजी दूर केली.  दरम्यान, त्या लहान चाहतीने व्हिडिओ तयार करुन आपला आनंद व्यक्त केला.

लग्नात आमंत्रण किंवा मिठाई न दिल्यामुळे या लहान चाहतीने एक व्हिडिओ शेअर केला होता.   त्यानंतर विजय आणि रश्मिकाने त्या मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं.  तसेच तिला जेवण दिलं. लहान चाहतीचे लाड केले.  या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी त्या लहान मुलीला हैदराबादमधील त्यांच्या घरी आमंत्रित करुन तिचे स्वागत केले. त्या लहान चाहतीने स्वत:  विजय आणि रश्मिकाच्या घरी दिलेल्या  भेटीचा, तसेच पाहुणचाराचा व्हिडिओ तिनं शेअर केला.  @urs_luckythalli या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, ती चिमुकली चाहती विजयच्या घरी जाताना दिसत आहे. जिथे विजय तिला उचलून आत घेऊन जातो.  नंतर, रश्मिका तिला लाडू खाऊ घालते. तसेच तिचा लाड करते.  विजयही यात सामील होतो. तो आपल्या लहान चाहतीशी गप्पा मारताना दिसत आहे.  तसेच तिला कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे.

 

याचा व्हिडिओ चिमुकलीनं सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडिओला चिमुकलीनं लांबलचक कॅप्शनही दिला आहे. 'खरंच.  विजय देवरकोंडाला त्याच्या घरी भेटणे हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खरोखरंच एक अद्भूत  आणि अविस्मरणीय क्षण होता.  आम्ही पोहोचताच त्यांनी स्वागत केले.  रश्मिका मंदानाला भेटून खूप आनंद झाला.  तिचा प्रसन्न, हसमुख चेहरा पाहून आनंद झाला.  त्यांच्यासोबत आणि त्यांच्या     कुटुंबासोबत वेळ  घालवल्याने हा अनुभव अधिकच  खास झाला.  प्रत्येक जण इतके दयाळू,   प्रेमळ आणि साधे होते की,   आम्हाला जणू आपल्याच माणसांमध्ये असल्यासारखे वाटले'.

'आमच्यात खूप छान गप्पा झाल्या. आम्ही खूप हसलो.  असे अनेक आनंदाचे क्षण एकत्र घालवले.  जे आम्ही कायम लक्षात ठेवू.   माझे संपूर्ण कुटुंब हा दिवस आयुष्यभर  जपून ठेवेल', असं म्हणत चिमुकलीनं व्हिडिओ शेअर केला. तसेच कॅप्शनद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.