Badshah Second Marriage: सिनेसृष्टीतून (Entertainment news) एक आनंदाची बातमी  समोर येत आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहने लग्न केले आहे. त्यानं दुसऱ्यांदा लग्न गाठ बांधली असल्याची माहिती आहे.  बादशाहच्या (Badshah marriage) लग्नाचे फोटो सध्या समाजमाध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहे.   गेल्या काही काळापासून बादशाहच्या लग्नाची चर्चा सुरू होती. परंतु, कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता अचानक पूनम रिखी नावाच्या एका महिलेनं लग्नाचे खास फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.  या जोडप्याने अत्यंत जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले आहे.  सध्या बादशाहवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  ईशा रिखी असे बादशाहच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. हे बादशाहचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने 2012 साली जैसमीन मसीहशी लग्न केले होते.  परंतु, त्यांचा संसार फार काळ काही टिकला नाही. 2020 साली दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.  आता घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर  बादशाहने पुन्हा एकदा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. गायक दुसऱ्यांदा  विवाहबद्ध झाला आहे.   दरम्यान, बादशाहने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर अद्याप कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेले नाहीत. परंतु, बादशाहच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  बादशाहने पंजाबी अभिनेत्री  आणि मॉडेल ईशा रिखीला आपली  जीवनसाथी म्हणून निवड केली.   या जोडप्याचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. ज्यात त्याचे कुटुंब तसेच जवळचे मित्र उपस्थित होते.  या फोटोंमध्ये बादशाह आपल्या पत्नीसोबत आनंदात लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ते एकमेकांना हार घालताना दिसत आहे.  ईशा रिखीची आई  आणि बहिणीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आहे. 

बादशाहने आपल्या लग्नात मेहेंदी रंगाचा कुर्ता घातला होता. तर, त्याची पत्नी ईशाने  लाल रंगाचा सूट परिधान केला होते. दोघेही एकत्र सुरेख दिसत होते.  सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

 

बादशाहची दुल्हनिया ईशा रिखी आहे तरी कोण? (Badshah Marriage news)

ईशा रिखी एक पंजाबी अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे. तिनं आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात 'जट्ट बॉयज पुट जट्टान डे' या चित्रपटातून केली. तिनं आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चित्रपटात काम केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  बादशाह आणि रिखी हे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.   मात्र, दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. आता त्यांच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.