Badshah Confirmed Divorce With Isha Rikhi: प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. आपल्या गाणांनी कित्येकांना थिरकायला लावणाऱ्या बादशाहाचा (Singer Badshah Divorce) संसार मोडल्याच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलेलं. अखेर आता स्वतः बादशाहनं सोशल मीडियावर पोस्ट (Badshah Social Media Post) करुन आपण पत्नी रिखीसोबत (Badshah Isha Rikhi Divorced) घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बादशाह आणि रिखी (Isha Rikhi) यांचं लग्न अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच झालेलं. दोघांनी एका खाजगी समारंभात आपली लग्नगाठ बांधलेली. पण, अवघ्या पाचच महिन्यांत त्यांच्या संसाराचा काडीमोड झाल्याचं समोर आलं आहे. 

Continues below advertisement

सिंगर बादशाहनं (Singer Badshah) ईशा रिखीसोबतच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यांच्या लग्नाला अवघे पाच महिने झाले होते. या जोडप्यानं मार्चमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केलेलं, मात्र जुलैपासूनच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. आता त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे घटस्फोटाला दुजोरा दिला आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करुन गायकानं लिहिलंय की, "ईशा रिखी आणि मी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा आणि आपापल्या मार्गांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर एकमेकांचा आदर ठेवून घेण्यात आला आहे आणि या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आम्ही सर्वांना विनंती करतो..."

Continues below advertisement

बादशाहनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, "या विषयावर हेच आमचं एकमेव निवेदन असेल. आमच्या नात्याबाबत कोणतेही तर्क-वितर्क किंवा अंदाज लावले जाऊ नयेत, अशी आम्ही विनंती करतो..." 

पोस्ट शेअर करताना बादशाहनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "प्रत्येक वादळ हा एक धडा असतो. प्रत्येक प्रार्थना ही एक आशा असते..." 

अलिकडेच, अभिनेत्रीची आई पूनम रिखी यांनीही 'कर्म' (Karma) या विषयावर काही पोस्ट्स शेअर केल्या होत्या. ईशा रिखीनं जूनमध्ये इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनीथिंग' (Ask Me Anything) सेशनमध्ये बादशाहसोबतच्या लग्नाला दुजोरा दिला होता.

2020 मध्ये जस्मिन मसीह हिच्याशी घटस्फोट

'बिग बॉस 20'मध्ये ईशा रिखी स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकते, अशा चर्चा सुरू असतानाच बादशाह आणि तिच्या घटस्फोटाबाबतची ही बातमी समोर आली आहे. बादशाहनं यापूर्वी जस्मिन मसीह हिच्याशी लग्न केलेलं. पण, 2020 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना जेसीमी ग्रेस मसीह सिंह नावाची मुलगी आहे, जिचा जन्म जानेवारी 2017 मध्ये झालेला.

कॉमन फ्रेंडच्या पार्टीत बादशाह आणि ईशा रिखी यांची झालेली भेट

बादशाह आणि ईशा रिखी यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झालेली. हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. मात्र, अनेक वर्ष दोघांनीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे काहीही कबूल केलं नाही, ज्यामुळे त्यांच्या नात्याबाबत चाहत्यांमध्ये केवळ तर्क-वितर्क लावले जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, बादशाह आणि रिखी यांच्या लग्नाच्या चर्चा, गायक पहिली पत्नी जस्मिन मसीह हिच्यासोबत विभक्त झाल्यानंतर साधारण सहा वर्षांनी सुरू झाल्या होत्या. 2023 मध्ये जेव्हा लग्नाच्या अफवा पसरल्या, तेव्हा बादशाहनं त्या फेटाळून लावल्या होत्या.