Dhurandhar Director Aditya Dhar On Deepika Padukone 2nd Baby Girl: बॉलिवूडचा (Bollywood News) बाजीराव रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या घरी गणेशोत्सवातच (Ganeshotsav) चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. दीपिका-रणवीरच्या लाडक्या दुआनंतर आता पुन्हा एकदा त्यांना कन्यारत्न प्राप्त झालंय. 19 सप्टेंबरला दीपिका दुसऱ्यांदा आई झाली. बॉलिवूडच्या पॉवर कपलवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अशातच 'धुरंधर' सिनेमाचा (Dhurandhar Director) दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यानं दीपिका-रणवीरच्या मुलीच्या जन्मानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. 

Continues below advertisement

दुसऱ्यांदा कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर दीपिका-रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोघांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी बाळाच्या पावलांचे लहानसे ठसे आणि त्यासोबतच, "स्वागत आहे, लेक, 19/9/2026, दुआ, दीपिका, रणवीर...", असा मजकूर होता.

Continues below advertisement

आदित्य धरची 'ती' पोस्ट चर्चेत (Dhurandhar Director Aditya Dhar Post) 

दीपिका आणि रणवीर यांच्या घरी आलेल्या कन्यारत्नावर 'धुरंधर' सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य धरनं लक्ष वेधून घेणारी पोस्ट केलीय. आदित्य धरनं आनंदाच्या बातमीबद्दल त्या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानं कमेंट सेक्शनमध्ये लिहिलंय की, "आधी 'लक्ष्मी'चं आगमन झालंय आणि आता 'सरस्वती'सुद्धा आलीय. तुमच्या दोघांसाठी मला खूप आनंद होतोय... कुटुंबात आणखी एका चिमुकल्या परीचं आगमन झालंय. ईश्वर तिला जगातील सर्व प्रेम आणि सुख-समृद्धी देवो..."

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्माबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाचा आधार घेतला. या नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या पालकांना शुभेच्छा देत विक्की कौशलनं 'अभिनंदन' अशी प्रतिक्रिया दिलीय.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या पहिल्या अपत्याचे, 'दुआ'चं स्वागत केलेलं आणि आता ते दुसऱ्यांदा आई- असून त्यांनी एका मुलीचे स्वागत केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nana Patekar Ganpati Photos: नाना पाटेकरांच्या घरातली बाप्पासमोरची आकर्षक आरास पाहिलीत? राहुल देशपांडेंनी घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओतल्या 'त्या' क्षणानं वेधलं सर्वांचं लक्ष, PHOTOs