Dhurandhar 2 The Revenge trailer release date: ब्लॉकबस्टर धुरंधर हा चित्रपट आता दुसऱ्या भागासह परतण्यासाठी सज्ज आहे. धुरंधरच्या पहिल्या भागात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांसह इतर कलाकारांची भूमिका लक्षवेधी ठरली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धुवांधार टीझर रिलीज झाला. या टीझरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर नेमकं कधी रिलीज होणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. धुरंधर हा चित्रपट 19 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. सध्या ट्रेलरच्या प्रतिक्षेत प्रत्येक प्रेक्षक आहे. दरम्यान, या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. रणवीर सिंहने आपल्या पोस्टमधून ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख शेअर केली आहे.
रणवीर सिंहचा धुरंधर हा चित्रपट डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला या चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली नव्हती. नंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दरम्यान, आता प्रेक्षकवर्ग धुरंधर चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत. धुरंधर 2 या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर रणवीर सिंह यानं पोस्ट शेअर करुन उत्तर दिलं आहे. त्यानं ट्रेलरबाबत अपडेट दिली आहे.
अलिकडेच रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बंदूक धरलेला दिसत आहे. पोस्टवर 'धुरंधर: द रिव्हेंज.. ट्रेलर 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 1 मिनिटाने रिलीज होणार', असं लिहिलं आहे. त्यानं या पोस्टवर, 'स्वत:ला तयार ठेवा', असं कॅप्शन देखील दिलं आहे. हा चित्रपट तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकवर्ग ट्रेलरची वाट पाहत होते. सुरुवातीला या चित्रपटाचा ट्रेलर 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली नव्हती. चंद्रग्रहणामुळे ट्रेलर प्रदर्शित होण्यास उशीर झाल्याचे उघड झाले. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर आता उद्या प्रदर्शित होईल, हे कन्फर्म झालं आहे. सध्या प्रेक्षकवर्ग या चित्रपटाच्या प्रतिक्षेत असून, 19 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांना धुरंधर 2 सिनेमागृहात पाहता येईल.
