Rang Maza Vegla Fame Reshma Shinde Pregnancy Good News Rumours: सिनेमांमध्ये झळकणारे कलाकारांचे फॅन फॉलोविंगबाबत आपल्या कुणाला सांगायला नकोच, पण छोट्या पडद्यावरच्या लोकांचे चाहतेही फार कमी नसतात. छोट्या पडद्यावरच्या मालिकांमधून सिनेस्टार्स घराघरांत पोहोचतात आणि चाहत्यांना अगदी आपलेसे वाटू लागतात. त्यांची दुःख, त्यांची सुखं सगळ्याशी प्रेक्षक अगदी नकळत जोडले जातात. या कलाकारांबाबत प्रेक्षकांना मोठं कुतूहल असतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, लग्न, मुलं यांसारख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मराठी मालिकाविश्वात असंच एक नाव गेल्या कित्येक वर्षांपासून गाजतंय, ते म्हणजे, रेश्मा शिंदे (Marathi Actress Reshma Shinde). 

Continues below advertisement

टेलिव्हिजनचा (Television News) पडदा गाजवणारी मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडलेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे बेबीबंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. त्यामुळे चाहत्यांना आता प्रश्न पडलाय की, रेश्मा खरंच गरोदर आहे की, मालिकेतल्या कथानकाचा काही भाग आहे.   

Continues below advertisement

रेश्मा शिंदे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी मालिकाविश्वात सक्रिय आहे. 'रंग माझा वेगळा' या प्रसिद्ध मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या रेश्मा शिंदे हिला मोठी पसंती मिळाली. पुढे ती मालिका संपल्यानंतर मात्र चाहत्यांना चिंता लागलेली की, आता आपली लाडकी अभिनेत्री कुठे झळकणार? त्यानंतर रेश्मा शिंदे 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी 'रंग माझा वेगळा' मालिकेप्रमाणेच तिच्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेवरही भरभरुन प्रेम केलं. अशातच आता याच मालिकेत एक ट्वीस्ट येणार आहे. त्यासाठीच रेश्मा शिंदेनं बेबी बंपसह लूक केलाय. 

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या सेटवरचा रेश्मा शिंदेचा एक फोटो व्हायरल होतोय. या मालिकेत रेश्मा साकारत असलेली जानकी प्रेग्नंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. जानकीच्या लूकमधील हे फोटो आहेत. मात्र चाहते ती खऱ्या आयुष्यात कधी आई होणार याची वाट पाहत आहेत. तशा कमेंटही त्यांनी रेश्मा शिंदेच्या फोटोंवर केल्यात. अनेकांनी तिला खरं काय आहे? हे तूच सर्वांना सांग असं म्हटलंय. तर, काहींनी खऱ्या आयुष्यातही तू लवकरच आई होशील, असंही म्हटलंय. 

दरम्यान, रेश्मा शिंदेनं 2024 मध्ये पवनसोबत आपली लग्नगाठ बांधली. रेश्माचा नवरा पवन हा साऊथचा आहे. म्हणजेच, मराठमोळी रेश्मा शिंदे साऊथची सूनबाई झालीय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्याबाबतची आणि तिच्या सासरच्यांबाबतची उत्सुकता आणखी वाढली. रेश्मानं आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'मला फक्त पीरियड्स आलेत...', 'सनई चौघडे' मालिकेत अनोखा ट्रॅक, शर्वरीला आलीय मासिक पाळी, जय खानोलकर प्रेमानं घेतो काळजी VIDEO