Rana Ji Maaf Karna Remake Trolled: जुनी गाणी ऐकली की, मन शांत होतं, असं अनेकजण म्हणतात. कित्येक वर्षांपूर्वीची गाणी आजही ऐकली की, मंत्रमुग्ध व्हायला होतं. पण, सध्याचा इंडस्ट्रीतला ट्रेंड मात्र बऱ्याच जणांना खटकतोय. सध्या इंडस्ट्रीत जुन्या गाण्यांचं रिमेक करण्याचा हॉट ट्रेंड इंडस्ट्रीत आलाय. सिनेमा असो वा एखादा म्युझिक अल्बम (Music Album), जुन्या लोकप्रिय गाण्यांना (Old Songs) आधुनिक शैलीची जोड देऊन ती पुन्हा सादर करण्याचा ट्रेंड सध्या जोमात आहे. सध्या ममता कुलकर्णीचं (Mamta Kulkarni) एक गाणं जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे.
ममता कुलकर्णींचं गाजलेलं 'राणाजी माफ करना...' (Rana Ji Maaf Karna) या गाण्याचं 'टिप्स म्युझिक'नं रिमेक केलंय. तनिष्क बागची यांच्या सहकार्यानं 'राणा जी 2.0' (Rana Ji 2.0) नावानं या गाण्याचं नवं वर्जन रिलीज करण्यात आलंय. मूळ गाणं 'करण अर्जुन' सिनेमातलं होतं, ज्यामध्ये ममता कुलकर्णी अमरीश पुरी यांच्यासोबत या गाण्यात झळकलेल्या. आता 31 वर्षांनी हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याचा अंदाज पूर्णपणे बदलून टाकला आहे.
नव्या गाण्यात 'राणाजी...' दिसलेच नाहीत... (Rana Ji Maaf Karna Remake Disappoints Netizence)
माहिरा शर्माच्या (Mahira Sharma News Music Video) नव्या म्युझिक व्हिडीओनं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. अनेक नेटिझन्सनी माहिराच्या डान्स स्टेप्सचं कौतुक केलं असलं, तरी त्यांना 'राणा जीं'ची उणीव प्रकर्षानं जाणवली. दरम्यान, हे गाणं पूर्णपणे माहिरावर केंद्रीत आहे आणि तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दुसरा कोणताही परिचित चेहरा दिसत नाही, यामुळे मूळ गाण्याचा जो मूळ बाज किंवा 'व्हाइब' (vibe) होती, ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. नेटकऱ्यांनी या गाण्याबाबतची आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. अनेकांनी अमरीश पुरी यांच्याशिवाय हे गाणं अपूर्ण वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. युजर्सनी कमेंट करत म्हटलंय की, "आम्हाला तुमची आठवण येतेय, राणा जी..."
दरम्यान, हे गाणं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरं उतरलं नाही. याव्यतिरिक्त, काहींनी यातील डान्स मूव्हजमुळे याला अश्लील ठरवलंय, तर एका व्यक्तीनं 'करण अर्जुन' सिनेमातील त्या गाजलेल्या क्लासिक गाण्याचा हा अपमान असल्याचं म्हटलंय.
"गाणं पाहून 'राणाजी...' कधीच माफ करणार नाहीत..." (Rana Ji 2.0 Trolled)
माहिरा शर्माच्या मादक नृत्याचं काही प्रमाणात कौतुक झालं असलं, तरी इंटरनेट युजर्सना या गाण्यात इतर काहीही आवडलेलं नाही. एका व्यक्तीनं तर अशी टिप्पणी केलीय की, जर तुम्ही हे गाणं डोळे मिटून ऐकलं, तरीही ते अगदी तसंच वाटेल. दुसऱ्या एकानं लिहिलंय की, "राणा जींची माफी मागू नका... ममता कुलकर्णींची माफी मागा..." आणखी एकानं कमेंट केलीय की, "आणखी एक गाणं खराब केलं..." एका कमेंटमध्ये म्हटलं होतं, "राणा जी, कृपया हे अजिबात माफ करू नका..." तर दुसऱ्या एकानं या गाण्याला 'अश्लील' म्हटलं आणि नमूद केलं की, ममता कुलकर्णींनी या गाण्याला योग्य न्याय दिला होता, तसेच आणखी एका कमेंटमध्ये म्हटलं गेलंय की, "राणा जी अजिबातच माफ करणार नाहीत..."
माहिरा शर्माचं गाणं पाहिलंत?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
