Ramesh Chandane Story: अभिनय क्षेत्रात अनेक तरुण तरुणी आपलं नशीब आजमावतात. मायानगरीत येऊन आपली कला सादर करतात. काहींना यश मिळतं तर, काहींच्या वाटेला स्ट्रगल येतं. तर, काहींच्या आयुष्यात प्रसिद्धी मिळते, पण नंतर हवे तसे मनासारखे प्रोजेक्ट्स मिळत नाही. असाच एका कलाकार म्हणजे रमेश चांदणे. या मराठी अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. हिंदी तसेच मराठी सिनेमांमध्ये आपली अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. पण सध्या त्यांना मनासारखे काम मिळेनासं झालंय. काम मिळालं तरी, ते अभिनेत्याच्या मनासारखे नसतात. माहितीनुसार, रमेश हे गेली 7 वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. रोल मिळाले तर ते रिक्षा चालकाचे मिळत असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. रमेश यांनी आपल्या मनातील खंत मुलाखतीतून बोलून दाखवली.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी अभिनेत्यानं 7 वर्षे रिक्षा चालवली (Ramesh Chandane Actor and Auto Rikshaw Driver)
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रमेश म्हणाला, 'मी रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यानंतर रमेश चांदणे याच्यावर चर्चा होऊ लागली. अभिनेत्यानं रिक्षा घेतली, अशी चर्चा रंगू लागली. मला पण तेव्हा वाटलं की, ओळख वाढू लागलीये. आता लोक अॅक्टर म्हणून ओळखू लागले. आता कामं मिळतील अशी आशा होती. ती आशा खरी झाली आणि मला रोल मिळू लागले. सगळेजण मला रिक्षा चालकाच्या रोलसाठी बोलवू लागले. पैशांसाठी मी या रोलसाठी हो म्हणायचो. रोज दिसणं महत्त्वाचं आहे ना...'
'मला रिक्षा चालकाचेच रोल मिळू लागले. मी ते रोल केले. सारखे तेच रोल मिळत असल्यामुळे मी एकदा रिक्षा चालकाच्या रोलला नाही देखील म्हणालो. पण काही जण असे म्हणायचे की, अरे मी हा रोल तुझ्यासाठीच लिहिला आहे. मी तुला बघितलंय या रोलमध्ये म्हणून लिहिला आहे. मग मला वाटू लागलं की, नहीं यार.. ये तो रिक्षावाले का ही रोल था... पण मी रिक्षाचालकाआधी एक नट आहे. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता मी रिक्षा वाल्याचा रोल नाकारतोय'.
'आज मला 7 वर्षे झाली रिक्षा चालवून.. मला आधी वाटलं होतं की, की फक्त 2-3 किंवा 6 महिने वर्षे रिक्षा चालवेन. पण आज मला 7 वर्षे झाली रिक्षा चालवून..मी माझ्यासाठी रिक्षा चालवतोय, त्यामुळे मी तुम्हाला दोष देणार नाही. मला फक्त रिक्षा चालकाच्या रोलसाठी बोलवण्यात येत होतं. जे सगळ्यात वाईट आहे. आजही मला त्यांनी नट म्हणून ओळखलंच नाहीये...किंवा त्यांना मी अॅक्टर म्हणून नकोय.. कदाचित. कारण त्यांची मर्जी असते ना, ते ठरवतात. कुणाला कोणता रोल द्यायचा हे सर्वस्वी त्यांचा निर्णय असतो ना..बरं मी रोल मागितला तर, ते...अरे तू हिरो.. असं म्हणतात. बरं नाहीये मी हिरो.. पण मग मी जाऊन म्हणू का की, हिरो नको दे असाच कोणताही रोल.. इथे मी स्वत:लाच कमी लेखतोय ना..', असं म्हणत रमेश चंदनेनं मनातील खंत बोलून दाखवली.
रमेश चांदणेनं आपल्या कारकिर्दीत, हॉस्टेल, फोर्स, सिक्रेट ऑफ गावस्कर, झपाटलेला 2 यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
