Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि यश (Actor Yash) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' (Ramayana) या पौराणिक सिनेमाचा ट्रेलर (Ramayana Movie Trailer) निर्मात्यांनी आज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर प्रदर्शित केला. सिनेमातील कलाकारांची सध्या सर्वत्र चर्चा होत असतानाच, एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, अख्ख्या सिनेमात हनुमानाची झलकच पाहायला मिळाली नाही. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सनी देओल (Sunny Deol) भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जातंय, पण सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हनुमान एकदाही कुठेच दिसला नाही.
4 मिनिटं 10 सेकंदांच्या ताज्या ट्रेलरमध्ये भगवान हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओलची झलक न दिसल्यानं चाहते निराश झालेत आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सनी देओलची चर्चा (Sunny Deol Missing As Hanuman)
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित सिनेमात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. टीझरपासून ते ट्रेलरपर्यंत सिनेमातील निम्म्याहून अधिक कलाकार आणि पात्रांची माहिती समोर आली असली, तरी सनी देओलचा मात्र अद्याप कुठेही पत्ता नाही.
सोशल मीडियावर सनी देओलचं नाव सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. अनेक युजर्स हनुमानाच्या भूमिकेतील त्याचा लूक लवकरात लवकर समोर आणण्याची मागणी करत आहेत. एका युजरनं कमेंट केलीय की, "जर यात सनी देओलचा हनुमानाचा लूकही दिसला असता, तर हा ट्रेलर आणखीनच जबरदस्त झाला असता..."
याव्यतिरिक्त, काही चाहते 'रामायण'च्या निर्मात्यांना प्रश्न विचारतायत की, ही माहिती इतकी गुप्त का ठेवली जातेय? पण, यासंदर्भातील अधिक तपशील केवळ सिनेमाचे निर्मातेच देऊ शकतात.
दरम्यान, सीबीएफसीनं (CBFC) 'रामायण'च्या दोन ट्रेलरसाठी सर्टिफिकेट्स जारी केली होती. त्यामुळे, सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओलची झलक पाहायला मिळू शकते.
सनी देओलचा आगामी चित्रपट
'रामायण: पार्ट 1' प्रदर्शित होण्यापूर्वी, सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बंटवारा 1947' (Bantwara 1947) थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा 14 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
