Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: नितेश तिवारी (Nitest Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' सिनेमाचा (Ramayana Movie) बहुप्रतिक्षित ट्रेलर (Ramayana Movie Trailer) ब्रम्हमुहूर्तावर रिलीज करण्यात आला. सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांना आवडला असून सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. ट्रेलरमध्ये रावण तर भाव खाऊन गेलाय, तर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकलेल्या रणबीर कपूरचं (Ranbir Kapoor) तेजस्वी रुप पाहून अगदी सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फिटलं आहे. तर, साई पल्लवीनं (Sai Pallavi) साकारलेली सीता माताही लक्ष वेधून घेतेय. अशातच सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळालीय. अशातच या दमदार स्टारकास्टमध्ये एक मराठमोळा चेहराही झळकला आहे. ट्रेलरमध्ये लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्याची (Marathi Actor) झलक पाहून सर्वांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. 

Continues below advertisement

4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जो मराठमोळा अभिनेता झळकला आहे, तो म्हणजे, आदिनाथ कोठारे (Adinath Kothare). 'रामायण' सिनेमात आदिनाथ कोठारे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून तो प्रभू श्रीरामांचे बंधू भरत यांची भूमिका साकारणार आहे. आदिनाथची (Marathi Actor Adinath Kothare) झलक ट्रेलरमध्ये पाहताच, मराठी प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ट्रेलरमध्ये प्रभू श्रीराम आणि भरत भेटीचा सीन दाखवण्यात आलाय. त्याच सीनमध्ये आदिनाथ कोठारेची झलक पाहायला मिळाली आहे.

प्रभू श्रीराम आणि भरतभेटीचा किस्सा नेमका काय?  (Story Of Lord Shri Ram And King Bharat)

Continues below advertisement

प्रभू श्रीराम आणि भरत यांची भेट म्हणजे बंधूप्रेम, त्याग आणि निष्ठा यांचा एक अत्यंत भावूक प्रसंग. जेव्हा भरताला रामाच्या वनवासाची आणि पित्याच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा त्यांनी राजगादीचा त्याग करून रामाला परत आणण्यासाठी चित्रकूट गाठले. जेव्हा प्रभू श्रीराम वनात असताना भरताला पाहतात, तेव्हा दोन्ही भावांचं प्रेम आणि अश्रू अनावर झाले. भरत श्रीरामांना आपल्यासोबत अयोध्येला परत येण्याची गळ घालतो, पण प्रभू राम स्पष्ट नकार देतात आणि भरताना परत जायला सांगतात. रामांचं म्हणणं ऐकून भरत परतीच्या प्रवासाला निघतो, पण स्वतःसोबत प्रभू श्रीरामांच्या पादुका घेतो. याच पादुका सिंहासनावर ठेवून भरत श्रीराम वनवास संपवून परत येईपर्यंत राज्य करतो. 

आदिनाथ कोठारेनं मराठी, हिंदी सिनेमे, मालिकांमध्ये केलंय काम (Adinath Kothare Work Front)

आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, आदिनाथ कोठारे प्रामुख्यानं मराठी सिनेमे आणि टीव्ही सीरिअल्समधील कामांसाठी ओळखला जात असला, तरी हिंदी प्रेक्षकांनी त्याला यापूर्वी 83 या बॉलिवूड सिनेमात पाहिलंय. कपिल देव यांच्यावरील 83 या बायोपिकमध्ये दिलीप वेंगसरकर यांची भूमिका आदिनाथ कोठारेनं साकारली आहे. त्यानं 'शास्त्री विरुद्ध शास्त्री' (Shastri Viruddh Shastri) सिनेमात जयेश दवे यांची भूमिकाही साकारलीय. जर तुम्ही ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सवर कार्यक्रम पाहत असाल, तर 'क्रिमिनल जस्टिस: अधूरा सच' (Criminal Justice: Adhura Sach) मधील इन्स्पेक्टर प्रशांत वाघमारे आणि 'सिटी ऑफ ड्रीम्स' (City of Dreams) मधील महेश आरावळे या भूमिकांमधून तुम्ही त्यांना नक्कीच पाहिलं असेल. याव्यतिरिक्त, 'क्राइम बीट' (Crime Beat) या वेब सीरिजमधील एसीपी मयंक शर्मा आणि 'द रॉयल्स' (The Royals) मधील झुबिन दारूवाला या भूमिकांमधूनही त्यांनी अलीकडच्या काळात आपली छाप पाडली आहे.

पाहा 'रामायण'चा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल